Bharti Singh
Bharti Singh  esakal
मनोरंजन

दुसऱ्या मुलासाठी तयार पण...भारतीच्या आहेत दोन अटी

युगंधर ताजणे

Tv Entertainment: कॉ़मेडियन भारती सिंग ही आता भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं बाळंतपण. यामुळे भारतीला ट्रोलही व्हावे लागले होते. बाळंत (Entertainment News) झाल्यानंतर अकरा दिवसांनीच ती पुन्हा सेटवर परतल्यानं तिला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले होते. भारती तुला मुलाची काळजी आहे की (Bharti Singh) नाही असा प्रश्नही तिला विचारला होता. त्यामुळे आपल्याला ट्रोल करणाऱ्यांवर भारतीनं निशाणा साधला. त्यांना जशास तसे उत्तरही दिले. मला (Bollywood Actors) तुम्ही काहीही म्हणालात तरी चालेल कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे मला माहिती आहे त्यामुळे तसेही मी नेटकऱ्यांचे फारसे मनावर घेत नाही. तीन एप्रिलला भारतीनं एका मुलाला जन्म दिला. तिची गोड बातमी ऐकून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. (Social Media Viral news)

भारतीनं आपल्या व्हॉल्गमध्ये एका विषयावर परखडपणे मत मांडलं आहे. ते म्हणजे दरवेळी आपल्याला वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल केले जाते. त्याचा परिणाम आपल्यावर होतो. अनेकदा लोकं कोणताही विचार न करता काहीही बोलत सुटतात. आपण जे बोलतो आहोत ते सत्य आहे की नाही याचीही कल्पना त्यांना नसते. कुठूनतरी काही ऐकलेलं, पाहिलेलं ते इतरांना सांगत असतात. त्यामुळे त्यांना आपण बरोबर आहोत असे वाटायला लागते. माझी गुड न्युज ऐकून मला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्याचा मला आनंदच आहे. मी त्या चाहत्यांचे आभारही मानले आहे. त्यांना धन्यवाद दिले आहे. यासगळ्यात मला आणखी एक नवा प्रश्न विचारण्यात आला आहे. तो म्हणजे दुसरा चान्स घेणार का.....

मी दुसऱ्या मुलासाठी तयार आहे. पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. मी सध्या माझ्या मुलाच्या देखभालीत व्यस्त आहे. त्यामुळे तुर्तास तरी माझा कोणता विचार नाही. भारती आणि हर्ष हे त्यांच्या मुलाला गोला असे म्हणून हाक मारतात. अजून त्यांनी त्याचे नाव ठेवलेले नाही. भारती आपल्या दुसऱ्या मुलाचा विचार करण्याबाबत म्हणते, आता पहिल्या मुलाच्या जन्मानंतर आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. लग्न झाल्यानंतर चार वर्षे निघुन गेली. वास्तविक पहिल्यांदाच प्रेग्नंसी प्लॅन करायला हवी होती. मात्र तसे काही झाले नाही. आता मला मुलीची अपेक्षा आहे. तेव्हा माझी पूर्ण फॅमिली पूर्ण होईल. असे नेटकरी मला म्हणत आहेत. मात्र त्यांना मी सांगु इच्छिते, ते म्हणजे आता आमचे कुटूंब पूर्ण झाले आहे. मला जर कुणी मुलगी होण्याची गॅरंटी दिली तर मी पुढील अपत्याचा जरुर विचार करेल. असेही भारतीनं यावेळी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT