Tv Entertainment News marathi actress Akashya Deodhar  esakal
मनोरंजन

Video Viral: राणादाच्या नावानं पाठकबाईंचा उखाणा! 'फुलावर...'

तुझ्यात जीव रंगला ही मराठी मालिका माहिती नाही असा मराठी प्रेक्षक शोधून सापडणे निराळा, या मालिकेनं मराठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली होती.

युगंधर ताजणे

Akshaya Deodhar News: तुझ्यात जीव रंगला ही मराठी मालिका माहिती नाही असा मराठी प्रेक्षक शोधून सापडणे निराळा, या मालिकेनं मराठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली होती. त्यातील राणादा (हार्दिक जोशी) आणि पाठक बाई (Marathi Entertainment News) (अक्षया देवधर) यांची प्रेमकथा प्रेक्षकांना कमालीची भावली. त्यामुळे या मालिकेचा टीआरपीही सतत वाढताना दिसला. सोशल मीडियावर देखील त्याचे मीम्स हे वेगवेगळ्या औचित्यानं समोर येत होते. आता हार्दिक जोशी आणि अक्षयाची गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अक्षया आणि हार्दिक आता विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांत या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होणार आहेत. Akshaya and hardeek joshi wedding news)

चाहत्यांना राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नाची उत्सुकता आहे. राणादासाठी (marathi actor) पाठकबाईंनी खास उखाणाही तयार केला आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. साखरपुड्यानंतर अक्षया आणि हार्दिक त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चाहत्यांकडून या दोन्ही सेलिब्रेटींच्या फोटो आणि व्हिडिओला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

अक्षयानं घेतलेला उखाणा आता चर्चेत आला आहे. तिनं ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा’. असा उखाणा घेताच तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. या दोन्ही सेलिब्रेटींना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

अक्षयाला तिच्या काही कुटूंबातील सदस्यांनी नाव घेण्यासाठी आग्रह केला. तो प्रेमळ आग्रह तिला काही मोडवला नाही. त्यानंतर तिनं त्यांच्या आग्रहाला मान देत घेतलेला उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांची मोठी पसंतीही मिळाली आहे. यापूर्वी अक्षयानं साखरपुड्याचे फोटो शेअर करताना ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिलं होतं. तेही तिच्या चाहत्यांना भावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT