Tv Entertainment  esakal
मनोरंजन

तुझेच गीत गात आहे: 'ती परत येतेय', प्रिया मराठे चाहत्यांच्या भेटीला

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेगळ्या धाटणीच्या मालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Tv Entertainment: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेगळ्या धाटणीच्या मालिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामध्ये अनेक ( Bollywood News) मालिकांचे रिपिट टेलिकास्ट दाखवले जात आहे. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. मराठी मालिकांनी प्रेक्षकांना चाकोरीबद्ध विषयात अडकवून न ठेवता विविध विषयातून मनोरंजनाची मेजवानी (Marathi Entertainment news) दिली आहे. त्यामुळे मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याचा प्रतिसाद प्रचंड आहे. एकाच मालिकाचे किमान दोन ते तीन पर्व मनोरंजन क्षेत्रात झाल्याची अनेक उदाहरणंही आहेत. अशीच एक मालिका सध्या चर्चेत आली आहे. त्या मालिकेचे नाव तुझेच गीत मी गात आहे. या मालिकेनं मोठ्या प्रमाणवर लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून भेटत आलीय. तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं. प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं. तुझेत मी गीत गात आहे या मालिकेत ती मोनिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, ‘स्टार प्रवाहसोबत मी याआधी जयोस्तुते आणि शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे. ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी. या मालिकेतही हटके लूक मध्ये दिसेन. पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत.

बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं. आताची पीढी प्रचंड हुशार आहे. मालिकेतली चिमुकली स्वरा आणि पिहू दोघीही कमाल आहेत. आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे. ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT