Namita Thapar And sheer Grover Team esakal
मनोरंजन

Shark Tank India: डील हातातून गेली नमिता नाराज, अशनीरचा फायदा

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारा शो म्हणजे शार्क टँक इंडिया. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ ऑनलाइन टीम

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारा शो म्हणजे शार्क टँक इंडिया. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शो मधील परिक्षक हा देखील नेटकऱ्यांच्या चर्चेतील विषय असतो. (Shark tank) त्यामध्ये अशनील ग्रोव्हर, नमिता थापर यांच्यातील जुगलबंदी ही प्रेक्षकांना आवडते. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रश्नात पाडले आहे. नमितानं त्या व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे (Social Media News) की, आपण अशनीरकडून एक डील हरलो. त्याबद्दल वाईट वाटले आहे. एमक्योर फार्माच्या सीईओ म्हणून लोकप्रिय झालेल्या नमिता थापर यांना आता शार्क टँकमधील जज म्हणून चाहते ओळखु लागले आहेत.

अशनीरकडून डील हारल्यानंतर नमिता यांनी तो शो सोडून दिला होता. एका मुलाखतीमध्ये नमिता यांनी सांगितलं होतं की, टॅगजेड फुड डील मला घेता आली नाही याचे वाईट वाटते. ही डील मी अशनीर यांच्याकडून हारले होते. जेव्हा ही डील माझ्या हातातुन गेली तेव्हा मी त्यांच्याकडे गेले होते. आणि त्यांच्याशी बातचीत देखील केली. रियलिटी शो शार्क टँकमध्ये टॅगजेड फुडचे काही लोकं सहभागी झाले होते. यावेळी अशनीर ग्रोव्हर आणि नमिता थापर यांनी त्यांच्याशी काही बातचीत केली. अमन गुप्ता आणि नमिता यांच्या डीलला अशनीरनं काऊंटर करत आपली एक वेगळीच डील त्या लोकांपुढे ठेवली होती.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नमिता थापर म्हणते की, मला ती डील मिस झाली याचे वाईट वाटते. ती एक चांगली कंपनी होती. आम्ही सगळेजण त्यासाठी फार लढलो. शो संपल्यानंतर देखील आम्ही त्या कंपनीच्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. त्यांनी अशनीरचं डिलिंग स्विकारले होते. नमिता आणि अमन यांनी 70 लाख आणि 4 टक्के अशी ऑफर त्या कंपनीला दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT