mini mathur  Team esakal
मनोरंजन

Indian Idol 12; 'आता पुन्हा मला तो शो होस्ट करायचा नाही'

2004 मध्ये सुरु झालेल्या या शो नं लोकप्रियतेची उंची गाठली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - लोकप्रिय मालिकांमध्ये अद्यापही इंडियन आयडॉलचा (indian idol) क्रमांक पहिल्या तीनमध्ये नक्कीच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा शो वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यात सातत्याने वाद समोर येताना दिसत आहे. नुकतीच या शो मधून स्पर्धक अंजली गायकवाड (anjali gaikwad) बाहेर पडली आहे. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. शो च्या परिक्षकांवरही गेल्या काही दिवसांपासून टीका सुरु आहे. त्यात सहभागी होणा-या सेलिब्रेटींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. (tv mini mathur wont host indian idol again says i cant handle again)

2004 मध्ये सुरु झालेल्या या शो नं लोकप्रियतेची उंची गाठली होती. 17 वर्षानंतर देखील त्याची ही लोकप्रियता कायम आहे. 2004 आणि 2005 मध्ये या रिअँलिटी शो ची होस्ट मिनी माथूर (Mini Mathur)होती. तिनं त्याच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या शो ची प्रसिध्द होस्ट ही तिची आयडेंटीटी झाली होती. या शोवर होणा-या आरोपांवरुन मिनीनंही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

mini mathur

2007 ते 2012 दरम्यान मिनीनं या शो चे होस्टिंग केले होते. तिच्या जोडीला लोकप्रिय टीव्ही कलाकार हुसेन होता. या दोघांनीही सुंदर सुत्रसंचालन यावेळी केले होते. त्यानंतर मिनी या मालिकेच्या होस्टिंगपासून दूर झाली. आता ती म्हणते मला या शो चे पुन्हा कधीही होस्टिंग करायचे नाही.

काही दिवसांपूर्वी मिनीनं आपल्या चाहत्यांसोबत आस्क मी एनीथिंग नावाचा गेम खेळला होता. त्यात तिला एकानं पुन्हा इंडियन आयडॉलचे होस्टिंग करशील का असा प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, मी त्या शो ला मोठं केलं, त्याला वाढवलं, आता त्याच्या पध्दतीनं वाटचाल करतो आहे. त्यामुळे मला पुन्हा त्या शो च्या वाट्याला जायचं नाही. मिनी गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT