Big Boss 16 Esakal
मनोरंजन

Big Boss 16: ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ अर्चनाने केला राडा ! भोगोवी लागणार सर्व स्पर्धकांना शिक्षा..

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 या लोकप्रिय शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.  यंदाच्या सीझनमध्ये अनेक राडे होत आहेत. नवे सरप्राईज प्रेक्षक आणि स्पर्धकांनाही मिळत आहेत. टाक्स पुर्ण करण्याच्या नादात कधी कुणात भांडण होइल सांगता येत नाही. त्यातच स्पर्धकांना एक सुखद धक्का बिग बॉसने दिला आहे. या आठवड्यात घरातील एलिमिनेशन रद्द करण्यात आले आहे

या  संपूर्ण आठवडा भर  घरात अर्चना गौतम आणि साजिद खान यांचा जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. अर्चना गौतम हिला घरातील ड्रामा क्विन म्हणतात आणि आता येत्या भागात अर्चना नवा ड्रामा करणार आहे. मात्र, तिचा ड्रामा हा सर्वांच्या अंगलट आल्याचा दिसत आहे.  यावेळी तिच्या चुकीची शिक्षा घरातील सगळ्या स्पर्धकांना होणार आहे.

बिग बॉसने शेअर केलेल्या नव्या प्रोमोत याबद्दल माहिती मिळत आहे. घरात नवा टास्क होणार आहे. ज्यात काही सदस्य घरातील गार्डन एरियात ठेवलेल्या खुर्चीवर बसलेले दिसताय तर, घरातील काही सदस्य त्यांच्यावर पाणी ओतत आहेत. मात्र हा टास्क करण्यास अर्चना गौतमने सरळ नकार दिलाय.

जेव्हा शिव तिला येण्यासाठी सांगतो तेव्हा अर्चना म्हणते की, मी माझ्या आरोग्याशी खेळ करणार नाही. मी बाहेर येणार नाही... थंड पाण्यामुळे मला ताप येतो...इतकच नाही तर ती बिग बॉसलाच धमकी देत आहे. ‘बसं आता तुमचं खुप झालं बिग बॉस’ असं म्हणते. यानंतर बिग बॉस भडकतो आणि म्हणतो, ‘ मी ही शिक्षा इथचं थांबवतो आता सर्व स्पर्धकांना याची शिक्षा भोगावी लागेल’. त्यामूळं आता बिग बॉस काय नवी शिक्षा देणार आणि त्यावर इतर स्पर्धक कशी प्रतिक्रिया देतात याकडे आता प्रेक्षंकाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT