twinkle khanna doing masters in london university akshay kumar  SAKAL
मनोरंजन

Twinkle Khanna Birthday: वयाच्या ४९ व्या वर्षी ट्वींकल खन्ना करतेय अभ्यास, लंडनमध्ये करतेय मास्टर्सची तयारी

ट्वींकल बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय

Devendra Jadhav

Twinkle Khanna Masters Degree News: अभिनेत्री ट्वींकल खन्नाचा आज वाढदिवस. ट्विंकल ही सोशल मीडियावर चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

ट्वींकल स्वतःच्या फिटनेसबद्दल कमालीची जागरूक असते. याशिवाय ती तिच्या ब्लॉग आणि इंस्टाग्राम पेजवर तिच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट शेअर करत असते.

ट्वींकल बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय ती म्हणजे अभिनेत्री आता मास्टर्स करायला लंडनला गेलीय.

(twinkle khanna doing masters in london university akshay kumar)

वयाच्या ४९ व्या वर्षी अभ्यास करणं ही फार मोठी गोष्ट आहे. ट्वींकलचा एक व्हिडिओ समोर आलाय या छोट्या व्हिडिओमध्ये ती तिच्या कॉलेजमध्ये जाताना,

मित्रांसोबत कॉफी घेताना आणि कॉलेजचे ओळखपत्र दाखवताना दिसते. ती तिच्या कॉलेजच्या इमारतीसमोर पोज देताना दिसत आहे ज्याच्या भिंतीवर 'गोल्डस्मिथ्स' लिहिलेले आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना ट्विंकल खन्नाने लिहिले की, 'या ग्रहावर तुमच्या आयुष्याची ५० वे वर्ष झाल्यावर विद्यापीठात परत जाण्याची भावना कशी आहे?

चांगलंय, मला इथे क्लासेस करून आता नऊ महिने झाले आहेत आणि मी मास्टर्स पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सबमिशन, ग्रेड आणि कॉफीच्या हजार कप द्वारे मी स्वतःला असे पाहीन हे कोणाला माहीत होते? काहीवेळा मला असे वाटते की मी लिखित स्वरूपाच्या मास्टर्सऐवजी आयुष्यात घेतलेल्या निर्णयांवर मास्टर्ससाठी अर्ज करायला हवा होता.'

ट्विंकल पुढे सांगते की.. दुसरीकडे.. वृद्धत्व हे गणितीय समीकरण आहे. ते कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. सहमत किंवा असहमत?' अशी पोस्ट ट्विंकलने लिहिली आहे.

अशाप्रकारे ट्विंकलने पोस्ट शेअर करून तिचा अनुभव शेअर केलाय. एकूणच वयाच्या ४९ व्या वर्षी ट्वींकल मास्टर्स करतेय ही फार वेगळी गोष्ट आहे. याशिवाय अक्षय कुमार सुद्धा बायकोला लंडनला भेटायला जात असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT