Udaipur Murder-Sharad Ponkshe Post viral
Udaipur Murder-Sharad Ponkshe Post viral Instagram
मनोरंजन

Udaipur Murder: 'हिंदूंनो जागे व्हा...',पोंक्षेंची पोस्ट Viral

प्रणाली मोरे

अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) नेहमीच आपल्या पोस्टमुळे चर्चेत येतात अन् त्यामुळे वादातही पडतात. गेल्या काही दिवसांत त्यांच्या एका पोस्टवरनं अनेकांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आदेश बांदेकरांनी,जे पोंक्षेंचेही चांगले मित्र आहेत त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावर पोंक्षेंनी बाजू मांडत आपलं म्हणणं मांडलं अन् तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण आता पुन्हा उदयपुरातील हत्याकांडावर(Udaipur Murder) त्यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली पण यावेळी मात्र सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा मिळतोय.(Udaipur Murder-Sharad Ponkshe Post viral)

राजस्थानमधील उदयपूरमध्ये(Udaipur) कन्हैय्यालाल या टेलरची दिवसा उजेडी गळा चिरुन हत्या करण्यात आली. कारण होतं भाजप नेत्या नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या पैगंबरांविरोधातील वक्तव्याला पाठिंबा देणं. आता खरंतर काही दिवसांपूर्वी कन्हैय्यालालने स्पष्ट केलं होतं की,''मला मोबाईल नीट वापरता येत नाही. मला व्हॉट्स अॅपवर नुपुर शर्मांची वादग्रस्त पोस्ट आली होती,ती चुकून माझ्या मुलाकडून व्हॉट्स अॅप स्टेटसवर पोस्ट झाली. मला मोबाईल नीट वापरता येत नसल्यामुळे ती काही काळ तशीच राहिली. पण त्यानंतर मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या''.

''१५ जूनपासून मला या धमक्या मिळतायत असं मृत्यूपूर्वी कन्हैय्यालाल म्हणाला होता. ११ जूनला त्या व्हॉट्सअप स्टेटसच्या पोस्टसाठी कन्हैय्यालाल विरोधात तक्रार नोंदवली गेली होती. पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचा प्रचार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली . पण त्यानंतर कन्हैय्यालालची जामिनावर सुटका झाली होती. १५ जूनला कन्हैय्यालालनं जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार नोंदवली. त्यावेळी त्यानं पोलिसांना सांगितलं होतं की, त्याच्या विरोधात तक्रार नोंदवणारा त्याचा शेजारी नाजिम आहे,ज्याला माहित होतं की मला मोबाईल चालवता येत नाही''.

त्यावेळी कन्हैय्यालालनं पोलिसांना सांगितलं होतं की,''नाजिमनं त्याच्या समाजाच्या दबावाखाली येऊन ती तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपासून नाजिम आणि त्याच्या सोबतीनं पाच जणं माझ्या दुकानासमोर फेऱ्या मारत आहेत ही कल्पना देखील कन्हैय्यालालनं पोलिसांना दिली होती. माझ्या फोटोला त्यांच्या समाजात व्हायरल केलं गेलंय आणि मला पाहताच जिवंत मारा असं देखील ते लोक सांगत सुटले आहेत असं देखील कन्हैय्यालाल म्हणाला होता''. आणि तो जे बोलला होता तेच घडलं,२८ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास दिवसाउजेडी सर्वांसमक्ष कन्हैय्यालालची गळा चिरुन हत्या करण्यात आली.

उदयपुरातील याच हत्याकांडावर आता शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी सावरकरांच्या एका विचाराची आठवण करुन दिली आहे. त्यात म्हटलं आहे, ''प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिन्दुस्थान जगू शकेल-वि.दा.सावरकर''. हा सावरकरांच्या विचारांचा फोटो शेअर करत पोंक्षे यांनी लिहिलं आहे की,''जे उदयपुरमध्ये घडले ते पाहिल्यावर स्वा.सावरकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार आठवतात,हिंदुंनो जागे व्हा''. या शरद पोंक्षे यांच्या पोस्टला पाठिंबा देत अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकानं लिहिलंय,'काल उदयपुरमध्ये जे घडलं ते हिंदू कडून झालं असतं तर सगळे आपल्यावर पेटून उठले असते...' पोंक्षे यांच्या या पोस्टवर अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला वाचायला मिळतील. ती पोस्ट इथं बातमीत जोडलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT