Uorfi Javed On Wrestler Protest Esakal
मनोरंजन

Uorfi Javed On Wrestler Protest: 'तुमचा खोटेपणा सिद्ध..', अजब फॅशनने सर्वांना चकित करणारी उर्फी कुस्तीपटूंसाठी उतरली थेट मैदानात..

Vaishali Patil

Uorfi Javed On Wrestler Protest: काल देशात दोन गोष्टींची खुप चर्चा झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आले. साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यव्रत कादियान यांना बसमधून ताब्यात घेण्यात आले.

हे खेळाडू जंतरमंतरवर उपस्थित होते आणि तेथून ते नव्या संसदेच्या दिशेने जात होते. सर्वांना जंतरमंतरवर थांबवण्यात आले आहे. दोलनाला बसलेल्या भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना पोलीस फरफटत, ओढत नेले.

या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरलही झाले. अनेक स्तरातुन या घटनेची निंदा केली.

दरम्यान या आंदोलनासदर्भात सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये विनेश आणि संगीता फोगट बसमध्ये बसलेले आहेत. यादरम्यान, दोन फोटोंचा कोलाज आहे ज्यात एका फोटोत ते गंभीर आहे तर दुसऱ्या फोटोत ते हसताना दिसत आहे.

आता हा फोटो शेयर करत उर्फी जावेद जी मनोरंजन विश्वातलं चर्चेतलं नाव आहे तिनेही सरकारवर ताशेरे ओढले आहे. उर्फी ही तिच्या फॅशनबरोबरच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिने आता हा फोटो शेयर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले 'आपले खोटेपणा सिद्ध करण्यासाठी लोक असे फोटो का एडिट करतात! एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी इतकं पातळी सोडून वागू नये की खोट्या गोष्टीची मदत घ्यावी लागेल.'

आता उर्फीने ही पोस्ट व्हायरल झाली आहे. नेटकरी तिच्या पोस्टवरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर काहीनीं तिला योग्य गोष्टीसाठी बोलल्यामुळे तिला पाठिंबा देत आहे.

केवळ उर्फीच नव्हे तर अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि हे अत्यंत चुकीच असल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात. यात स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर यांचाही सामावेश आहे.

यावेळी स्वराने मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टिका केलीय. स्वराने मोदी सरकारचा एक फोटो पोस्ट केला. यात ऐकीकडे अनेक साधूबाबांसोबत मोदी उभे आहेत तर दुसरीकडे भारतीय कुस्तीपटू महिला दिसून येत आहेत. हा फोटो कोलाज करून स्वराने विरोधाभास दाखवलाय. स्वरा लिहिते.. भारत अशीच प्रगती करत राहील.. आपण कशासाठी मतदान केले आहे ते येथे आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT