Prarthana Behere and Shreyas Talpade  file
मनोरंजन

माझी तुझी रेशीमगाठ: नेहासमोर येणार यशची खरी ओळख?

काय असेल नेहाची प्रतिक्रिया?

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका सध्या खूप गाजतेय. त्यामधील श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरेची (Prarthana Behere) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की परांजपे याचं खरं रूप सगळ्यांसमोर येत आणि नेहाशी त्यांचं लग्न मोडतं. यशच्या मनात नेहाबद्दल प्रेम आहे या भावनेची जाणीव तर यशला झाली आहे, पण नेहासमोर ते प्रेम व्यक्त करण्याची हिंमत तो करत नाही. अनेकदा आपली खरी ओळख नेहाला सांगण्याचा प्रयत्न यश करतो पण ते ही अशक्य होतं. परांजपे यशचा वचपा काढण्यासाठी यशच्या आधीच नेहाला त्याची खरी ओळख सांगतो आणि नेहाला या गोष्टीचा धक्का बसतो.

दुसरीकडे समीर यशला नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आग्रह करतो. यश नेहाला सगळं खरं सांगण्याचं मनाशी पक्क करतो. पण त्याच्याआधीच नेहाला यशाची खरी ओळख पटली आहे. त्यामुळे नेहा आता यशची बाजू ऐकून घेईल का, यश नेहासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करू शकेल का, नेहा आणि यशचं मैत्रीचं नातं प्रेमात बदलेल की तिथेच संपेल, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

श्रेयस यामध्ये यशची भूमिका अत्यंत चोख साकारतोय. तसंच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहरे ही नेहा कामतची भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे बाल कलाकार मायरा वायकुळ. मायरा हिने या मालिकेत परीची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर आधीच स्टार ठरलेली चिमुकली मायरा मालिकेच्या एका एपिसोडसाठी दहा हजार रुपये मानधन घेत असल्याचं समजतंय. चार वर्षांची असणारी मायरा टिकटॉक स्टार असून तिच्या टिकटॉक वरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Ban For Children : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करा; हायकोर्टाची केंद्र सरकारला सूचना

Morning Breakfast Recipe: एकाच प्रकारचे कटलेट बनवण्यापेक्षा असेही ट्राय करा, सर्वजण आवडीने खातील, नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 26 डिसेंबर 2025

हिवाळा - आरोग्यदायी ऋतू

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT