Urfi Javed  esakal
मनोरंजन

Urfi Javed : उर्फीचं नशीब उजळलं, बॉलीवूडमध्ये चमकण्याची मिळाली संधी!

उर्फी आता लवकरच बॉलीवूडच्या एका चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

युगंधर ताजणे

Urfi Javed will be making her debut in Ekta Kapoor : मनोरंजन विश्वात उर्फीचं नाव माहिती नाही असे म्हणणारा विरळाच म्हणावा लागेल. सोशल मीडियावर उर्फीची नेहमीच चर्चा होत असते. त्याला कारण तिचं वागणं, तिचा अतरंगी पेहराव आणि बोलणं. याकारणामुळे उर्फी काहीही करते. तिला कुणाची भीती नाही, कोण काय म्हणते याचा ती जराही विचार करत नाही.

उर्फीवर यापूर्वी कित्येक सेलिब्रेटी बोलले आहेत. काही महिन्यांपूर्वी तर उर्फीवरुन राजकीय वादंग उठले होते. एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानं उर्फीला धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. याउलट उर्फीनेच त्यांच्यावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्याची चर्चा झाली होती. फॅशन जगतामध्ये उर्फीनं वेगळी ओळख तयार केली आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

उर्फी लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी काहीही करु शकते हे तिच्या आतापर्यतच्या फॅशनमुळे दिसून आले आहे. उर्फीन तिच्या घरातील एक वस्तू शिल्लक ठेवलेली नाही की ज्याचा उपयोग तिनं तिच्या फॅशनसाठी केला नाही. यामुळे उर्फी चर्चेत राहिली आहे. तिला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिच्यावर गंभीर स्वरुपात टीकाही केली आहे. उर्फीवर कारवाई करण्याची मागणीही सातत्यानं होताना दिसते.

उर्फीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे उर्फी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उर्फी लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी तिच्या काही पोस्टवर कमेंट करुन तिला शुभेच्छाही देण्यास सुरुवात केल्या आहेत. उर्फी तुझं नशीब बदललं, आता तुला चित्रपटात पाहता येणार अशा आशयाच्या प्रतिक्रिया उर्फीला मिळत आहेत.

टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या एका लव सेक्स और धोका २ मध्ये उर्फी दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली होती. असेही म्हटले जात आहे की, या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी उर्फीला विचारणा करण्यात आली आहे. उर्फीच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले असून त्याचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी हे करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT