Urfi Javed controversial tweet of death said Life is too short to.. sakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी डिप्रेशन मध्ये? आज ना उद्या मरणारच.. म्हणत आत्महत्येवरून केलं खळबळजनक ट्विट..

गेली काही दिवस उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे, पण आता तिच्या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

नीलेश अडसूळ

Urfi javed: आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असणारी उर्फी गेले काही दिवस एका वेगळ्याच वादात सापडली आहे. तिच्या फॅशन आणि तोकड्या कपड्यांवर राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने हा वाद चांगलाच पेटला. या वादाला आता 15 दिवस उलटून गेले तरी उर्फी काही गप्प बसायचं नाव घेईना.. नुकतच तिने आत्महत्येवर एक ट्विट केलं आहे..

(Urfi Javed controversial tweet of death said Life is too short to..)

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर आक्षेप घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तिच्या कपड्यांवर सडेतोड टीका केली. त्यानंतर उर्फी देखील चांगलीच चवताळली. तिनेही रोज एक ट्विट करून चित्रा वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला. हा वाद काही थांबता थांबेना.. उर्फीने पुन्हा एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये तिने आत्महत्येचा उल्लेख केला आहे. यावरून उर्फी डिप्रेशन मध्ये आहे की काय? अशाही चर्चा सुरू झाल्या आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

उर्फीने एक ट्विट केलंय, यामध्ये ती म्हणते, 'आत्महत्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.. त्यामुळे धीर धरा म्हणजे तुम्ही नक्की मराल..' आता ही ट्विट तिने नेमकं कुणासाठी लिहिलं आहे, ही माहीत नाही पण नेटकऱ्यांनी मात्र यावरून तिची खिल्ली उडवली आहे. असं ट्विट करून उर्फी मोठी तत्वज्ञानी झाली की काय?, एवढी सुधारली कधी? अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT