Urfi Javed diagnosed with laryngitis,share video from dubai Google
मनोरंजन

Urfi Javed ला झालाय 'Laryngitis' हा विचित्र आजार,डॉक्टरांनी दिलीय सक्त ताकीद..म्हणाली..

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद दुबईच्या सहलीवर गेली असताना तिथं आजारी पडली,तेव्हा डॉक्टरांनी तिला झालेल्या या विचित्र आजाराचे निदान केले आहे.

प्रणाली मोरे

Urfi Javed: आपल्या अतरंगी लूकनं आणि अंदाजानं नेहमीच चर्चेत पहायला मिळणारी उर्फी जावेद सध्या एका विचित्र आजाराशी झुंज देत आहे. उर्फीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत पहायला मिळतो,ज्यात ती एका दुबईतील हॉस्पिटलमध्ये नजरेस पडतेय. उर्फीनं हे देखील सांगितलं की तिला नेमका कोणता आजार झाला आहे. (Urfi Javed diagnosed with laryngitis,share video from dubai)

उर्फी या आजारामुळेच दुबईतील हॉस्पिटलमध्ये भरती झाली आहे. उर्फीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत एका हॉस्पिटलमधला व्हिडीओ शेअर केला होता. उर्फीनं सांगितलं की तिला Laryngitis नावाचा आजार झाला आहे. या आजारासंदर्भात कोणाशीही काही बोलायला डॉक्टरनं उर्फीला मनाई केल्याचं तिच्या एका मित्राकडून कळालं आहे. तसंच,तिला स्वतःलाही न बोलण्याची ताकीद डॉक्टरांनी दिलीय कारण या आजारात स्वरयंत्राचा दाह खूप त्रासदायक असतो.

उर्फीनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिचा चेहरा थोडा विचित्र दिसतोय,थकलेला दिसतोय आणि खूप बदलेला दिसतोय. या व्हिडीओच्या एका झलकमध्ये तरी तिला खरंच काहीतरी गंभीर झालंय हे स्पष्ट दिसतंय. उर्फीला या आजारातून बरं व्हायला किती वेळ लागेल आणि सध्या तिची परिस्थिती कशी आहे यासंदर्भात तरी तिनं काहीच माहिती दिलेली नाही.

Urfi Javed diagnosed with laryngitis,share video from dubai

काही दिवसांपूर्वी हॉट साडी लूकमध्ये उर्फी एअरपोर्टवरनं आता जाताना दिसली खरं ,पण तेव्हा कोणालाच अंदाज आला नव्हता की ती नेमकी कुठे आणि का चाललीय. पण त्यानंतर लगेचच समोर आलेल्या व्हिडीओत उर्फीला विचित्र अवस्थेत पाहून तिचे चाहतेच नाहीत तर तिला ट्रोल करणारेही चिंतेत पडलेयत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT