Urfi Video Viral 
मनोरंजन

Urfi Video : 'पैसावाली ताई'! उर्फीनं रस्त्यावरच्या मुलांना वाटल्या 500 च्या नोटा

तुम्हाला माझे कपडे आवडत नसतील तर काही हरकत नाही. पण मला हॉटेलमध्ये प्रवेशच नाकारणे हे योग्य नाही.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Help Poor Kids : सोशल मीडियावर उर्फीचा एक दिवस असा जात नाही की ज्यामुळे ती चर्चेत येत नाही. उर्फी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फीच्या अतरंगी फॅशनला कोणतीही वस्तू पुरेशी असल्याचे दिसून आले आहे. मात्र सध्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमुळे उर्फीवर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडिया क्वीन म्हणून उर्फीचे नाव घेतले जाते. तिनं आता एका हॉटेलच्या बाहेर असलेल्या लहान मुलांना पाचशेच्या नोटा वाटल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी ही चर्चेत आली आहे. उर्फी आपल्या कारमध्ये बसण्यासाठी निघाली असताना त्या मुलांनी तिच्या कारभोवती गर्दी केली होती. त्याचवेळी उर्फीनं मुलांना पाचशेच्या नोटा वाटून धमाल उडवून दिली आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उर्फीनं त्या मुलांना पाचशेच्या नोटा दिल्यानंतर त्यापैकी एक मुलगा पुन्हा तिच्याकडे येतो आणि तिच्याकडे पैशांची मागणी करतो. तेव्हा ती त्याला मी सगळ्यांना पाचशेच्या नोटा दिल्या.एवढे पैसे देऊनही तुम्ही समाधानी का नाही, असा प्रश्न तिनं त्या मुलाला विचारला होता.

कपड्यांमुळे उर्फीला इंट्री मिळाली नव्हती.. काही दिवसांपूर्वी उर्फीला एका हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर तिनं त्या हॉटेलबाहेर राडा केला होता. उर्फीनं आपल्याला हॉटेलमध्ये प्रवेश का दिला जात नाही? असा प्रश्न तिनं कर्मचाऱ्यांना केला होता. मॅनेजरसोबत तिचा वादही झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.

तुम्हाला माझे कपडे आवडत नसतील तर काही हरकत नाही. पण मला हॉटेलमध्ये प्रवेशच नाकारणे हे योग्य नाही. तुम्ही माझ्याशी असे वागू शकत नाही. त्यानंतर उर्फीच्या चाहत्यांनी या गोष्टीवरुन ते हॉटेल आणि मॅनेजरवर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यांना ट्रोल करण्यात आले होते. काहींनी उर्फीचा हा नेहमीप्रमाणे ड्रामा असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT