Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेद अडकणार लग्न बंधनात? फोटो शेअर करत म्हणाली, 'तो...'

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने रिलेशनशिपबद्दल पोस्ट केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद ही असं नाव आहे ज्याबद्दल जास्त माहिती द्यायाची गरज नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनमुळे सर्वांनाच परिचीत आहे. ती नेहमी अशी काही फॅशन करते जी पाहिल्यानंतर तिच्या कल्पनाशक्तीवर विश्वासच बसत नाही. मात्र नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा तिच्या फॅशनचा किंवा तिच्या कपड्याबद्दल नसून तो तिच्या रिलेशनशिपबद्दल आहे.

होय उर्फी जावेद कुणाला तरी डेट करत असल्याच तिनं म्हटलंय. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यावर फुलांचा गुच्छ आहे आणि लिहिलेलं आहे की, त्यानं होय म्हटलं.

ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिपचे वारे वाहु लागले. नेटिझन्सने लगेचच उर्फीला तिचा जोडीदार सापडला असल्याचा अंदाज लावला. या पोस्टवर तिने हृदयाचा एक इमोजी देखील बनवला, ज्याला पाहून लोक उर्फीला तिचा पार्टनर भेटला असं म्हणतं आहे.

आता सोशल मिडियावर तिच्याच नावाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र उर्फीनं त्यावर असं काही लिहिलेल नाही की ती रिलेशनशिपमध्ये आहे किंवा लग्न करणार आहे. अद्याप तरी तिनं याबद्दल काहीच स्पष्ट सांगतिलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर अनेक युजर्सने मुलगा कोण असा प्रश्न तिला विचारणं सुरु केलं आहे.

अनेकांनी तिचं अभिनंदन केलयं तर एकाने लिहिले की असा खजिना कोण सोडेल? तर दुसऱ्याने लिहिले की तो भाग्यवान मुलगा कोण आहे? तर एकानं थेट तिला लग्न कधी आहे असाच सवाल केला आहे. निदान त्याला तरी चांगले कपडे घालू दे असा सल्लाही काहींनी तिला दिला आहे. उर्फी जावेदची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उर्फीला रिअॅलिटी शोच्या ऑफर्स आल्याच्या बातम्या येत होत्यात . रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' आणि कंगनाच्या 'लॉकअप 2'साठी तिला अप्रोच करण्यात आले आहे असं बोललं जात होत मात्र उर्फीनं या बातम्यावर स्पष्टपणे नकार कळवला होता. आता तिला कोणी आणि कशासाठी होकार कळवला आहे. हे तर लवकरच कळेलचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT