Urfi Javed Mother Video Viral Esakal
मनोरंजन

Urfi Javed Mother: आपल्या मुलीपेक्षा काकणभर सरसच आहे उर्फी जावेदची आई.. जीममधील व्हिडीओनं नेटकरी खुळावले

उर्फी जावेदची आई झाकिया सुल्ताना या उर्फी प्रमाणेच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळतात.

प्रणाली मोरे

Urfi Javed Mother Video Viral: इंडस्ट्रीत काही असे कलाकार आहेत ज्यांना भले शोज किंवा सिनेमा मिळत नसतील तरी देखील त्यांची पॉप्युलॅरिटी आणि फॅनफॉलॉइंग जबरदस्त आहे. यामध्ये कदाचित सगळ्यात पहिलं नाव उर्फी जावेदचं आहे. जी भले काही मालिकांमध्ये आणि रिअॅलिटी शो मध्ये दिसली असेल,पण तिला प्रसिद्धी आणि पॉप्युलॅरिटी तिच्या अतरंगी फॅशन आणि कपड्यांमुळे मिळाली आहे.

उर्फी जावेद प्रत्येक दिवशी एक नवा..विचित्र आऊटफिट घालते आणि चर्चेत येते. कधी ती टॉपलेस होऊन कॅमेऱ्यासमोर येते तर कधी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीनं आपलं शरीर झाकताना दिसते तर कधी तिचा ड्रेसच तुमच्या विचारक्षमतेपलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीपासून बनवलेला असतो.

आता हळूहळू उर्फीसोबत तिच्या बहिणीदेखील चर्चेत येताना दिसत आहेत. आज आपण बोलूया ते उर्फीची आई जिचं नाव आहे झाकिया सुल्ताना हिच्याविषयी. उर्फीच्या आईचा जीममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.(Urfi Javed Mother hot sexy video zakiya sultana)

उर्फी जावेद तर इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय दिसतच असते पण आता तिच्यासोबत तिची आई झाकिया सुल्ताना देखील इन्स्टाग्रामवर आपले फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात. उर्फीची आई कधी आपल्या आऊटफिट्सचे रील्स बनवून शेअर करते तर कधी आपल्या मुलींसोबत रील बनवून ते शेअर करताना दिसते.

जसं आताच आपण बोललो की उर्फीची आई झाकिया सुल्ताना इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते,तर बातमीत जोडलेला तिचा जीम मधील व्हि़डीओ याचं एक उदाहरण म्हणता येईल.

उर्फी जावेदच्या आईचा जीममधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या आईनं गुलाबी ट्रॅक पॅंट आणि टी-शर्ट परिधान केलेलं आहे. झाकिया सुल्ताना जीममध्ये मेहनत करताना दिसत आहेत. घाम गाळत व्यायाम करताना रील्स देखील बनवत आहेत. रील पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की-''स्वतःची प्रगती करण्यावर लक्ष ठेवा..,स्वतःला उगाच सिद्ध करण्यात वेळ घालवू नका''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT