Kareena kapoor, Urfi javed Instagram
मनोरंजन

Urfi Javed: 'आता मला चार-पाच दिवस तरी..', करीनानं केलेलं कौतूक ऐकून भारावली उर्फी जावेद

उर्फीच्या फॅशन सेन्सवर व्यक्त होताना करीनानं तिचा आत्मविश्वास मला आवडतो असं म्हटलं होतं.

प्रणाली मोरे

Urfi Javed: बॉलीवूडची बेबो म्हणजे करीना कपूर सध्या आपला टॉक शो 'व्हॉट वीमेन वॉंट' मुळे भलतीच चर्चेत पहायला मिळते आहे. करिना अनेकदा आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. करिनाच्या शो च्या प्रेमात अनेक चाहते आहेत.

काही दिवसांपूर्वीच करीनानं उर्फीच्या फॅशन सेन्सची जोरदार प्रशंसा करत तिच्याविषयी मोठमोठी वाक्य ती बोलून गेली होती. एवढंच नाही तर करिनानं उर्फीच्या हिमतीला देखील दाद दिली. आणि जेव्हा हे उर्फीला समजलं तेव्हा तिनं खास अंदाजात करिनाचे आभार मानले.(Urfi Javed reacts On kareena kapoor comment)

नुकतंच करिनानं उर्फीची प्रशंसा करत म्हटलं होतं की,''मी उर्फी एवढी साहसी मुळीच नाही. मला वाटतं की ती खूपच धाडसी आहे. ज्या आत्मविश्वासानं ती आपल्या ड्रेसला कॅरी करताना दिसते ते खूपच अद्भूत आहे. माणसाचा आत्मविश्वासच त्याला सुंदर बनवतो आणि उर्फीचा आत्मविश्वास मला खूप आवडतो''.

बेबो पुढे म्हणाली,''उर्फीला जे वाटतं ती तसंच करते आणि यालाच फॅशन म्हणतात. उर्फीच्या बोल्डपणात खूप सहजता आहे. आणि ती तसंच प्रेझेन्टही करते ते. मी स्वतः एक आत्मविश्वासू मुलगी आहे, म्हणून मला उर्फीचा आत्मविश्वास आवडतो. मला तिची चालायची पद्धत खूप आवडते''.

करीनाच्या या वक्तव्यानंतर उर्फीनं आपल्या ट्वीटर हॅंडलवर बेबोचे आभार मानले आहेत आणि लिहिलं आहे,''करीना खरंच असं म्हणाली आहे का की तिला मी आवडते. मला खरंच विश्वास नाही बसत की खरंच असं घडलं आहे''.

यानंतर उर्फीनं तिच्या इन्स्टा स्टोरीत देखील शेअर केलं आहे की,''मला चार-पाच दिवस लागतील यावर विश्वास ठेवायला, जेव्हा क्वीनच मला पसंत करते आहे तर मला इतर कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT