Urfi Javed Death Threat: Esakal
मनोरंजन

Urfi Javed Death Threat: लवकरच तुला गोळ्या घालू! उर्फीला मिळाली जीवे मारण्याची धमकी! तिने दिला असा रिप्लाय

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा ती यामुळे अडचणीतही येते.

Vaishali Patil

Urfi Javed Death Threat: आपल्या आगळ्या-वेगळ्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी नेहमीच अशी काही फॅशन करते की ती पाहिल्यानंतर नेटकरी डोक्याला हात लावतात. ती नेहमीच काही ना काही अतरंगी फॅशन करत असते. फॅशन बरोबरच तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे देखील ती चर्चेत असते.

मात्र बऱ्याच वेळा तिचा हा फॅशन सेन्स अनेकांना आवडत नाही त्यामुळे ती अडचणीत येते. तिच्या अशा फॅशनमुळे तिच्यावर टिका देखील होते. तिला नेटकरी खुप ट्रोल करतात. अशातच आता तर एका नेटकऱ्यांने तिला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली आहे. उर्फीने स्वत: ट्विटरवर चाहत्यांना ही माहिती देत यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

उर्फीने नुकतच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एकाने तिला जीवे मारण्याची धमकी देत लिहिले आहे की, 'लवकरच तुला गोळी मारली जाईल. हे मिशन लवकरच पूर्ण होईल, तू भारतात जी घाण पसरलेली आहे ती लवरच साफ केली जाईल.'

आता सर्वसामान्य माणसाला जर अशी धमकी आली तर तो नक्कीच घाबरला असता मात्र त्यावर उर्फीनं अशी काही प्रतिक्रिया दिली आहे की त्यामुळे उर्फी खरच कुणालाच घाबरत नाही की काय अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. उर्फीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील नियमित दिवस.'

उर्फीने पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी उर्फीला पाठिंबा दिला आणि तिला त्या व्यक्तीबद्दल तक्रार दाखल करायला सांगतिली. एकानं लिहिलयं, 'तू घाबरू नकोस पण त्या लोकांवर कायदेशीर कारवाई कर' तर दुसर्‍याने लिहिलयं, "त्यांना भुंकू दे, तू खरी धाडसी मुलगी आहेस जिला मी कधीही घाबरताना पाहिले नाही तू फक्त दुर्लक्ष कर."

उर्फीबद्दल सांगायचं झालं तर तिला बिग बॉस ओटीटीमधून नाव-प्रसिद्धी मिळाली. उर्फीने अनेक डेली सोपमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत. अलिकडेच ती बिग बॉस ओटीटी 2 मध्ये मध्ये पाहुणी म्हणून गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT