Uorfi Javed Esakal
मनोरंजन

Uorfi Javed: कोण तू? उर्फी जावेदनं टाळ्या वाजवून केलं इरफान खानच्या मुलाचं स्वागत मात्र त्यानं तर....

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्येच काय तर सर्वत्रच विचित्र फॅशन सेन्समुळं चर्चेत असलेलं नाव म्हणजे उर्फी जावेद. ती कुठेही दिसली तर पहिले लक्ष ते तिच्या कपड्याकडे जाते. ती जिथे ही जाते तिथली लाईमलाईट तिच्याकडे वळतेच असंच काहीसं झालं ते बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या पार्टीत. त्यांनी गुरुवारी मुंबईत त्यांच्या नवीन फॅशन फिल्म 'मेरा नूर है मशहूर'चा प्रीमियर आयोजित केला होता

या फिल्म इव्हेंटमध्ये जया बच्चनपासून इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स पोहोचले होते. दरम्यान यात उर्फी जावेदही आली होती. पापाराझी उर्फीचे फोटो काढत असतांनाच तिथे दिवंगत स्टार इरफान खानचा मुलगा बाबिल खानही दिसला.

त्यावेळी उर्फीने कार्यक्रमात बाबिलचे कौतुक केले. तिने पापाराझीच्या लक्षात आणुन दिलं की बाबिल आला आहे आणि तो खुप चांगला आहे. तुम्ही बाबिलचे फोटो काढा. मात्र यादरम्यान बाबीलने एक नजरही उर्फीकडे पाहिलं नाही. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला.

हा व्हिडिओ पाहताच युजर्सनी कमेंट करायला सुरुवात केली. एकानं लिहिलंय की, बाबिलने उर्फीची सर्व लाइमलाइट घेतली. तर एकाने लिहिलयं की बाबिलने उर्फीला भावही दिला नाही. तर काहींनी बाबीलच्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे. एका यूजरने लिहिले की, स्टारकिड नेहमीच मुलींचे कपडे का घालतात.

बाबिलने उर्फी जावेदकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याचे काही फोटो देखील समोर आले आहेत, ज्यांना पाहून हे स्पष्ट होते की बाबिलने उर्फीकडे दुर्लक्ष केले नाही. उलट दोघेही एकमेकांना भेटले. बबिलने हसत उर्फीची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT