Urfi Javed on turning heads with a bold sartorial style esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फी जावेदला मोठा झटका! इंस्टाग्रामने अकाउंट केलं सस्पेंड

Vaishali Patil

Urfi Javed Instagram Account Suspended: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. सोशल मिडियावर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

कधी तिच्या अतरंगी फॅशनमुळे तर कधी तिच्या बेताल वक्तव्यामुळे उर्फीची चर्चा होतेच. मात्र आता उर्फीला मोठा झटका मिळाला आहे. उर्फी जावेदबाबत एक बातमी समोर आली आहे.

उर्फी जावेदने अलीकडेच एक इस्टास्टोरी शेअर करून चाहत्यांनाही धक्का दिला आहे. तिने चाहत्यांना सांगितले की तिचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. उर्फी जावेद अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देत असते.

मात्र आता इंस्टाग्रामने तिचे अकाउंट सस्पेंड केल्यामुळे नेटकऱ्यांनी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्यात. काहींना ही बातमी कळाल्यानंतर वाईट वाटलं तर काहींनी आनंद व्यक्त केला.

व्हायरल स्क्रीनशॉटनुसार आता उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. हा स्क्रीनशॉट उर्फीने स्वतः शेअर केला आहे. या इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंडिंग स्क्रीनशॉटमध्ये, मेटाने तिला अनेक सल्ले दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे तिचे खाते सस्पेंड करण्यात आल्याचे सांगितले.

महत्वाचं म्हणजे तिचे खाते सस्पेंड होऊनही दिसत आहे. यानंतर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये तिला इन्स्टाग्रामवरून एक मेसेज आला होता की, 'तुमचे अकाउंट चुकून बंद झाले होते. जे आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. आता तुम्ही लॉग इन करू शकतात. गैरसोयीबद्दल क्षमा करावी. धन्यवाद... इंस्टाग्राम टीम. तर हा फोटो शेयर करत तिने लिहिले आहे की, 'म्हणजे तुम्हीच ठरवा.'

उर्फी जावेद तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर येत असते. तिचे इंस्टाग्राम सेमी न्यूड फोटोंनी भरलेले आहे. तिचे फोटो इंस्टाग्रामवर येताच व्हायरल होतात. काही लोकांना ते आवडतात तर अनेक लोक तिच्यावर टीका करतात.

अनेकदा लोकांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट बॅन करण्याची मागणी केली होती. आता नेटकऱ्यांची ही इच्छा पुर्ण झाली मात्र थोड्याच वेळासाठी कारण नंतर ते रिकव्हर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT