Urvashi Rautela Rishabh Pant News Esakal
मनोरंजन

Urvashi-Rishabh: 'ना वो शख्स बुरा था..', उर्वशी सांगणार तिची अधुरी लव्हस्टोरी..

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela Rishabh Pant News: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र ती सध्या क्रिकेटपटू ऋषभ पंतमुळे चर्चेत आहे. ऋषभ पंत काही दिवसांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यानंतर मात्र पुन्हा उर्वशीच्या पोस्टच्या चर्चा रंगल्या.

तिने ऋषभचं नाव न घेता, त्याच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर ती ऋषभवर उपचार होत असलेल्या रुग्णालयाबाहेरही दिसली. नेहमीच तिला ऋषभच्या नावाने चिडवण्यातही येत. मात्र आता अलीकडेच तिने एक फोटो शेअर केलाय त्यावर ऋषभ पंतच्या चाहत्यांनी उर्वशीला ट्रोल केले. त्याचवेळी, आता पुन्हा एकदा उर्वशी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टपेक्षा त्याच्या कॅप्शनचीच जास्त चर्चा रंगली आहे. उर्वशी लवकरच 'तौबा मेरी तौबा' गाण्यात दिसणार आहे. उर्वशीने तिच्या आगामी गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. तिनं हे गाणे पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'किस्मत बुरी थी मेरी, ना वो शख्स बुरा था...जिस वक्त दिल लगा, वो वक्त बुरा था'

शरद मल्होत्रासोबत 'तौबा मेरी तौबा' गाण्यात उर्वशी स्क्रिन शेअर करणार आहे. या गाण्यात उर्वशी तिची प्रेमकहाणी सांगतांना दिसणार आहे. पोस्टरमध्ये उर्वशी आणि शरद तुटलेल्या आरशात समोरासमोर उभे आहेत. हे गाणे याच महिन्यात ६ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

दरम्यान उर्वशी ऋषभसोबतची तिची अधुरी कहाणी मोठ्या पडद्यावर गाण्याच्या माध्यमातुन चाहत्यांना सांगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या पोस्टला चाहत्यांनी तिला तशाच काही प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात शिक्षकांची रिक्त पदे, बी.एल.ओ नेमणूकीने शिक्षणाचा खेळखंडोबा

Muddy Water Supply : शिरूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; पाणी इतके घाण कि आंघोळही करणे टाळले

Junnar News : पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला आले यश

शाळेत निघालेल्या ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार! नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, फिर्यादी असलेल्या पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

SCROLL FOR NEXT