Urvashi Rautela esak
मनोरंजन

Urvashi Rautela: 'वहिनी फिनेल पितील बरं का? उर्वशी 'सॅड', नेटकरी जोमात

यापूर्वी देखील उर्वशी आणि पंत हे त्यांच्या वादामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा, मनोरंजनाचा विषय झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela Latest Photos: प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला यांच्यातील वाद का काही चाहत्यांना नवा नाही. दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे होत असतात. आता उर्वशीनं इंस्टावर जी एक पोस्ट केली आहे त्यावरुन ती ट्रोल झाली. ती चर्चेत आली याचे कारण तिनं त्या व्हिडिओला दिलेली कॅप्शन. नेटकऱ्यांनी तिची ती पोस्ट ही भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंतला रिलेट केली असून त्यावरुन अनेकांनी उर्वशीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी देखील उर्वशी आणि पंत हे त्यांच्या वादामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा, मनोरंजनाचा विषय झाल्याचे दिसून आले आहे. उर्वशीनंतर अनेकदा त्याच्यावर टोकाचे आरोप करुन आपण किती आक्रमक आहोत आणि आपल्याला त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्याचे दाखवून दिले आहे.

उर्वशीच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सडकून कमेंट केल्या आहेत. त्यावरुन तिला ट्रोल देखील करण्यात आले आहे. उर्वशी तू प्लिज असं काही बोलू नको. आम्हाला नाराज करु नकोस वाटल्यास आम्ही पंतशी एकदा बोलून घेतो. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उर्वशी चर्चेत आली आहे. आणि नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा मुख्य विषय राहिली आहे. मिस युनिव्हर्स देखील क्रशसाठी वाट पाहते असे म्हणून एका नेटकऱ्यानं उर्वशीची छेड काढली आहे.

ऋषभच्या मागे लगेच ऑस्ट्रेलियाला गेली....

उर्वशी ही आता ऋषभच्या मागे लगेच ऑस्ट्रेलियाला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, ऋषभ दादा वहिनी आता फिनाईल प्यायच्या बाकी आहेत. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, मॅडम तुम्ही काळजी करु नका. वेळ आल्यावर सगळेच बदलतात. हेही दिवस निघुन जातील. त्यामुळे कोण काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका. असे त्या चाहत्यानं म्हटले आहे.

उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, माझ्या मनाला जे वाटलं ते मी फॉलो केलं आहे त्यामुळे मी आता थेट ऑस्ट्रेलियापर्यत आले आहे. यावेळी बॅकग्राउंडला सात समंदर पार में तेरे पिछे पिछे आ गयी हे गाणं वाजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT