Urvashi In Kantara 2 Esakal
मनोरंजन

Urvashi In Kantara 2: ऋषभ शेट्टी च्या 'कांतारा 2'मध्ये दिसणार उर्वशी, नेटकरी म्हणाले, 'पंत नाही तर शेट्टीच...'

सकाळ डिजिटल टीम

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर चाहते आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कांतारा2' बाबत जेव्हाही काही नवीन अपडेट येते तेव्हा चाहत्यांची उत्सुकता वाढते. या चित्रपटाबाबत नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली होती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिकृत घोषणा केली आहे की 'कांतारा' हा सिक्वेल नसून प्रीक्वल असणार आहे.

आता 'कांतारा 2'शी संबंधित आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला ही आता 'कांतारा 2'चा भाग बनली आहे. खुद्द उर्वशीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे.

उर्वशी रौतेला ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा'च्या दुसऱ्या भागात अभिनय करताना दिसणार आहे. याचा खुलासा तिने इंस्टाग्रामवर केला आहे. तिने ऋषभ शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने कॅप्शन दिले आहे, 'Kantara 2 @rishabshettyofficial loading #RS.'

उर्वशीने या फोटोसोबत हात जोडण्याचा एक इमोजी देखील शेअर केला आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोज देणारी उर्वशी चित्रपटाबद्दल खूप आनंदी दिसत आहे.

उर्वशी रौतेलाचे चाहते या घोषणेमुळे खूप आनंदी दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या आणि ऋषभच्या फोटोवर लोकांच्या अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे नेहमी प्रमाणे काही यूजर्सने तिला टोमणे मारले आहेत. एका यूजरच्या या फोटोवर कमेंट करताना त्याने लिहिले, 'पंत नाही तर शेट्टीच ठिक आहे, फक्त ऋषभ असावा.' तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'दीदी, तुझ्या आयुष्यात किती ऋषभ आहेत?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT