Cannes Film Festival 2023 Urvashi Rautela Look: eSAKAL
मनोरंजन

Cannes 2023: गळ्यात मगरीचं पिल्लू लटकवून कान्समध्ये पोहचली उर्वशी! पाहून नेटकरीही...

Vaishali Patil

Cannes Film Festival 2023 Urvashi Rautela Look: फ्रान्समधील कान्स शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 16 मे ते 27 मे दरम्यान पार पडणार आहे. फ्रेंच शहरात कान्स येथे दरवर्षी आयोजित हा महोत्सव केला जातो. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीही आपल्या ग्लॅमरचा तडका या महोत्सवात लावला.

अनुष्का शर्माशिवाय मानुषी छिल्लर, सारा अली खान, ईशा गुप्ता, प्रियांका चोप्रा, उर्वशी रौतेलाही पोहोचल्या होत्या. उर्वशी रौतेला कूठे गेली अन् की तिची चर्चा होतेच यात काही नवं नाही. कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर उर्वशीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती खुपच सुंदर दिसत होती. मात्र तिने गळ्यात असं काही घातलं की त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

बॉलिवूड ब्युटी क्वीन उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या मोहक शैलीने चाहत्यांची मने जिंकली. उर्वशीने गुलाबी गाऊनमधील तिच्या ओपनिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या फ्रिल गाऊनमध्ये ती कमाल दिसत होती.

उर्वशीने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे. ज्यामध्ये ती एका कमी दिसत नाहीये. कतिच्या लूकवर चाहते प्रेम करत आहेत.

उर्वशीचा हा लूक रेड कार्पेटसाठी परफेक्ट आहे. अभिनेत्रीने केसांचा अंबाडा बनवला आहे आणि त्यासोबत तिने प्राचीन दागिनेही नेले आहेत.

उर्वशीच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेईल. तिने गाऊनसोबत मगरीचा हार घातला आहे. इतकच नाही तर तिने ऑफ-शोल्डर गुलाबी गाउनसह कानात मोठे लूप घातले होते. जे त्याच्या नेकपीसशी जुळतात. या कानातल्यांना दोन छोट्या मगरी जोडल्या आहेत.

उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या जबरदस्त लुक्सने सर्वांचे लक्ष वेधण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी देखील उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते.

उर्वशी रौतेलाने तिच्या फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी तिला खुपच ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जर गळ्यातील सरडा जिवंत झाला तर तू फोटोशूट सोडून पळ काढशील'

तर दुसऱ्याने लिहिले की, तू खूप सुंदर आहेस, पण गळ्यात सरडा का लटकवला आहेस? तर काहींना तिला पाहिल्यानंतर पुन्हा ऋषभ पंतची आठवण आली आहे. त्याच्या नावाचा उल्लेख करत एकानं लिहिलयं की, ऋषभ या सर्व गोष्टींना घाबरतो, म्हणूनच तो तुमच्यापासून दूर पळतो आहे.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसणार आहे. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT