Vaibhav Mangale Birthday news actor fears to watch horror films sakal
मनोरंजन

Vaibhav Mangale Birthday: ज्याला अख्खी इंडस्ट्री घाबरते, असा वैभव मांगले ती गोष्ट दिसताच भीतीने काढतो पळ..

अभिनेता वैभव मांगलेचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

vaibhav mangle: अभिनेते वैभव मांगले म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. मालिका नसो, नाटक किंवा चित्रपट त्यात वैभव मांगले असणार म्हणजे भूमिका चोख वाजणारच. म्हणूनच यांनी साकारलेला 'टाइमपास' मधील शाकाल अजूनही आपण विसरू शकलेलो नाही.

वैभव मांगले अजून एका गोष्टीसाठी ओळखले जातात ते म्हणजे, त्यांचा स्पष्टवक्तेपणा.. त्यांना जी बाब खटकते त्याविषयी ते अत्यंत परखडपणे भाष्य करतात. ते इकते फटकळ आहेत की अक्खी मराठी इंडस्ट्री त्यांना घाबरून असते.

ते वेळोवेळी खटकणाऱ्या गोष्टींवर सडेतोड भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच ते नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर बोलले होते. अशा वैभव मांगले यांचा आज वाढदिवस आज ते आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील एक खास बात.. की ज्यांना सगळे घाबरून असतात, असे वैभव मांगले नेमके घाबरतात तरी कुणाला..

(Vaibhav Mangale Birthday news actor fears to watch horror films)

वैभव मांगले यांनी आजवर अनेक भूमिका केल्या. त्यांचा टाइमपास चित्रपट असो की मालिकांमधील विनोदी काम.. त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी 'अलबत्या गलबत्या' नाटकातूनही त्यांनी चेटकीण बनून छोट्या दोस्तांना वेड लावले.

सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेमध्येतर नरहरी पंत या 200 वर्षाच्या भुताची भूमिका करत आहेत. अत्यंत विचित्र असा अवतार या भूमिकेसाठी त्यांनी केला आहे. त्यांचे हे रूप पाहून सगळेच घाबरतात. साध्या ते स्वतः भुताची भूमिका करत असले तरी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यांना स्वतःला भुतांची प्रचंड भीती वाटते.

एका मुलाखतीत वैभव मांगले म्हणाले होते, ' मी भुताची भूमिका करत असलो तरी खऱ्या आयुष्यात मला भयपट अजिबात आवडत नाहीत, कारण मला त्याची खूप भीती वाटते. मी भूतांना खूप घाबरतो. त्यातील संगीताने मला खूप घाबरायला आणि दचकायला होतं.'

'त्यामुळे मी लहानपणी तर भयपट पाहिलेच नाहीत. पण अलीकडच्या काळातही भुताचा चित्रपट पाहिला नाही. भीती नैसर्गिक भावना आहे आणि माणूस जर घाबरला नसता तर तो जिवंतच राहू शकला नसता.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT