varun mother birthday 
मनोरंजन

वरुण धवनने घरीच साजरा केला आईचा वाढदिवस

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः अभिनेता वरुण धवनचा कुली नं. 1 हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. चित्रपटगृहे सुरू झाली की कोणत्याही क्षणी तो प्रदर्शित होऊ शकतो. यामध्ये सारा अली खानबरोबर तो रोमान्स करताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक पोस्टर्स त्याने सोशल मीडियावर टाकले आणि चाहत्यांनी त्याला चांगल्या कमेंटस्् दिल्या. आज वरुणने आपल्या आईचा बर्थ डे सेलिब्रेट केला आणि त्याने तो फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे.

वरुण धवनने स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटाव्दारे रुपेरी पडद्यावर आगमन केले. त्यानंतर बद्रिनाथ की दुल्हनियां, हम्टी शर्मा की दुल्हनियां, बदलापूर, स्ट्रीट डान्सर 3डी, कलंक अशा काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तो उत्तम अभिनेता आणि डान्सरही आहे. त्याची तुलना गोविंदाबरोबर केली जाते. कलंक आणि स्ट्रीट डान्सर ३ डी या त्याच्या चित्रपटांना म्हणावा तसा व्यवसाय केला नाही. त्यामुळे आता तो चित्रपट स्वीकारताना खूप सतर्क आहे. कुली नं. 1 हा चित्रपट त्याचे वडील डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे. 

बाप व बेटा म्हणून ते पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करीत आहेत. या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. आज त्याची आई करुणा धवन हिचा वाढदिवस. तो त्याने केक कापून घरी साजरा केला. आपल्या आईचा वरुण लाडका आहे. त्याने आईला हॅपी बर्थ डे अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : भूममध्ये पोलिसाचेच चार लाख पळवले

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT