Varun Dhawan battling with vestibular hypofunction says i lost my balance
Varun Dhawan battling with vestibular hypofunction says i lost my balance  Google
मनोरंजन

Varun Dhawan ला झालाय 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' हा विचित्र आजार; म्हणाला,'माझ्या शरीराचा...'

प्रणाली मोरे

Varun Dhawan : 'भेडिया' सिनेमाच्या माध्यमातून वरुण धवन मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार आहे. सध्या तो त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कृती सनन सोबत तो या सिनेमात दिसणार आहे. दोघांनी याआधी 'दिलवाले' सिनेमात एकत्र काम केलं आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला होता,ज्याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. प्रेक्षकांना वरुण धवनची व्यक्तिरेखा भलतीच आवडलेली देखील दिसून आलं आहे. (Varun Dhawan battling with vestibular hypofunction says i lost my balance )

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वरुण धवनने सिनेमातील व्यक्तिरेखेसोबतच काही वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही शेअर केल्या. वरुण धवनने सांगितलं की सध्या तो 'वेस्टीबुलर हायपोफंक्शन' या आजाराचा सामना करत आहे. या आजारामुळे माणसाला आपल्या शरीराचा तोल सांभाळणं कठीण होऊन बसतं. कोरोनानंतर जेव्हा काम सुरू झालं तेव्हा वरुण धवनला या आजारामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याला मनाच्या विरोधात जाऊन शूटिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.

जेव्हा वरुणला आपल्या या आजाराविषयी कळलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला होता. सगळं संपलं असं वाटत होतं त्याला त्यावेळी. या सगळ्यातून बाहेर येणं ही त्याच्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती. कोरोनानंतर जेव्हा शूटिंग सुरू झाल्या तेव्हा या आजारानं डोकं वर काढत त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला होता असं वरुण म्हणाला. 'जुग जुग जियो'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळावा,सिनेमा चांगला व्हावा यासाठी आपण खूप ताण घेतल्याचं वरुण म्हणाला. ''मला वाटत होतं मी कोणत्या इलेक्शमध्ये भाग घेतला आहे. मला माहित नाही मी स्वतःला इतकं प्रेशरमध्ये का टाकलं होतं,पण मी ते केलं हे नक्की''.

वरुण धवन पुढे म्हणाला,''काही दिवस आधीच मी वेस्टीबुलर हायपोफंक्शन आजाराचा सामना करत आहे याविषयी सांगितले होते. मला माहित नाही,मला काय झालं आहे,पण आता मला कळतंय बॅलन्स खूप गरजेचा आहे आयु्ष्यात. पण माझी तीच गोष्ट बिघडली आहे. मी स्वतःला आता यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आपण फक्त रॅट रेस मध्ये भाग घेतल्यासारखं पळतोय. खरंतर आपण या जगात एका ध्येयानं आलेलो आहोत असं मला वाटतं. आणि मी सध्या माझं तेच ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटत इतरांनाही त्यांचे ध्येय पूर्ण करता यायला हवे''.

वरुणला झालेला वेस्टिबुलर हायपोफंक्शन आजार म्हणजे कानातील एक बॅलन्स सिस्टम असते जी यामध्ये व्यवस्थित काम करत नाही. कानाच्या आत वेस्टिबुलर सिस्टम असते,जी डोळ्यांच्या सहाय्यानं काम करत असते आणि आपल्या स्नायूंना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ही सिस्टम व्यवस्थित काम करत नाही,तेव्हा कानानं ऐकू येणाऱ्या गोष्टी मेंदू पर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही,आणि मग ज्या व्यक्तिला ही समस्या आहे त्याला चक्कर यायला लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT