Varun Dhawan-Janhvi Kapoor In 'Bawaal' Movie Instagram
मनोरंजन

Janhvi Kapoor आणि वरुण धवनच्या 'बवाल' सिनेमाचं प्रदर्शन 'या' कारणामुळे पडलं लांबणीवर..

'बवाल' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यामागे नेमकं कारण काय आहे याचा खुलासा स्वतः निर्मात्यांनी केला आहे.

प्रणाली मोरे

Varun Dhawan-Janhvi Kapoor In 'Bawaal' Movie: नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटद्वारा निर्मित, नितेश तिवारीद्वारा दिग्दर्शित आणि वरुण धवन, जान्हवी कपूर अभिनीत आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'बवाल'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे.

अशातच, चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे की व्हीएफएक्स (VFX) आणि टेक्निकल आवश्यकतांमुळे सिनेमाच्या रिलीजमध्ये डिले होऊ शकतो. तसेच, पोलंडमध्ये विशेष टेक्नोलॉजी वापरून या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून, निर्माते एक महत्त्वाकांक्षी ऑनस्क्रीन सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.(Varun dhawan Janhvi kapoor bawaal movie release postponed due to 'this' reason)

याबद्दल बोलताना दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "या सीक्‍वेन्सवर आम्हाला जसे व्हिज्युअल परफेक्शन मिळवायचे आहे, त्यासाठी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे. आमचे बेस्ट व्हर्जन दर्शकांसमोर सादर करणे हे आमचे ध्येय असल्याने आम्ही कोणत्याही गोष्टीशी तडजोड करू इच्छित नाही."

'दंगल' आणि 'छिछोरे' नंतर, नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'बवाल' चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशातील लखनऊसह ॲम्स्टरडॅम, नेदरलँड आणि पोलंड या ठिकाणी झाले असून, नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळेल.

अशातच, नाडियादवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियादवाला यांनी 'बवाल'ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Poisoning Case : मादी बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, विष घालून मारल्याचा प्राथमिक अंदाज

Janhavi Kandula Case : न्याय मिळाला! अमेरिकेत पोलीस वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या जान्हवीच्या कुटुंबाला 260 कोटींची मोठी नुकसानभरपाई

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये धगधगती कार; शालिमार परिसरात भर रस्त्यात चारचाकीला आग

IND vs PAK : आर अश्विनची 'स्मार्ट' आयडिया! फेकाड्या उस्मान तारिकला 'डिवचण्या'चा फंडा सांगितला! म्हणाला, भारताने तर.. Video

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

SCROLL FOR NEXT