actor varun dhawan
actor varun dhawan Team esakal
मनोरंजन

वरुण धवनचं पुतणीसोबत बर्थ डे सेलिब्रेशन, फोटो पाहिलेत ?

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा सोशल (social media) मीडियावर अॅक्टिव्ह असणारा अभिनेता आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्यानं त्याच्या पुतणी सोबत केलेले बर्थ डे सेलिब्रेशन. त्याचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वरुणची पुतणी नियाराच्या (niyara) वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानं ते इंस्टावर शेअर केले आहेत. ( varun dhawan niece niyara birthday celebration wrote a special caption )

वरुण धवन हा त्याच्या लूकसाठीही सोशल मीडियावर प्रसिध्द असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा सोहा अली खान सोबत कुली नं १(cooli no 1) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. वरुणच्या लूक बरोबर त्याच्या फिटनेसचीही चर्चा होत असते. त्यानं आता जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांनी लाईक्स केले आहे. नियाराला जन्मदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

त्या फोटोंमध्ये वरुणनं आपला मोठा भाऊ रोहित धवन (Rohit Dhawan) आणि वडिल डेव्हिड धवन (David Dhawan) , करुणा धवन (Karuna Dhawan) दिसत आहेत. याशिवाय त्याच्या परिवारातील इतरही सदस्य आहेत. हे सर्व नियाराचा जन्मदिन साजरा करताना दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये नियारा केक कापताना दिसत आहे. दुस-या फोटोंमध्ये रोहित धवन नियाराला केक भरवताना दिसत आहेत.

तिस-या फोटोमध्ये वरुण धवन नियारा जवळ उभा असून त्यात त्याची पत्नी नताशा दलालही दिसत आहे. हे सर्व फोटो त्यानं आपल्या इंस्टावरुन शेअर केले आहेत. त्या फोटोंना त्यानं घर असे कॅप्शनही दिले आहे. आतापर्यत त्या फोटोंना पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेक सेलिब्रेटींनी नियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT