vedat marathe veer daudale saat team, kolhapur, jyotiba temple, vedat marathe veer daudale saat news SAKAL
मनोरंजन

Video: यशस्वी झाले तरीही पाय जमिनीवर.. वेडात मराठे... मधील मराठी कलाकारांनी कोल्हापुरात पंगतीत केलं जेवण

अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे

Devendra Jadhav

Vedat Marathe veer daudale saat movie news: महेश मांजरेकर सध्या वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात सुपरस्टार अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

याशिवाय सिनेमात प्रवीण तरडे, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, हार्दिक जोशी असे लोकप्रिय कलाकार आहेत. महेश मांजरेकर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

नुकतंच या सगळ्या कलाकारांनी मिळून जमिनीवर मांडी घालून पंगतीत जेवणाचा आस्वाद घेतला.

(Vedat Marathe veer daudale saat movie team visit jyotiba temple and have dinner in kolhapur)

वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात सूर्याजी दांडेकर हि भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शिंदेने हा व्हिडिओ शेयर करत हा अनुभव सर्वांना सांगितला.

उत्कर्ष लिहितो.. "वेडात मराठे वीर दौडले सात "च आमचं शूटिंग कोल्हापूर मध्ये करत असताना आमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सर सर्व टीम मेंबर्स ला "दखनचा राजा जोतिबा देवस्थान "ला घेऊन गेले .

उत्कर्ष पुढे लिहितो.. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनात एक नट म्हणून इतकं काही शिकतोय ते शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये. एक वेगळाच अनुभव. सर्व गुणी कलाकारांना सोबत वेळ घालवता येतोय. प्रवीण तरडे दादा ,सिद्धू दादा आणि माझे सर्व अन्य मित्र.

ह्या सर्वांसोबत जोतिबा देवस्थान गेलो असता यांच्या सोबत जमिनिवर पंगतीत बसून जेवता आलं. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेता आला.

उत्कर्ष शेवटी लिहितो.. खरं तर इतक्या गप्पा गोष्टी अनुभव घड्तायेत कि माझ्या येणाऱ्या आयुष्याला समृद्ध करतील असे क्षण व्यतीत करतोय सध्या .एक कलाकार म्हणून एक व्यक्ती एक माणूस म्हणून खूप काही शिकायला मिळत आहे सर्वांकडून.

तुम्हा सर्व रसिक माय बापाच्या आशीर्वादा मुळे हे शक्य होत आहे. अशा शब्दात उत्कर्षने हा भारावून जाणारा अनुभव शेयर केलाय.

काहीच दिवसांपूर्वी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता.

यावेळी तो फोटोग्राफीसाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT