veena jagtap name in matrimonial site actress got angry SAKAL
मनोरंजन

Veena Jagtap: वीणा जगतापचं मॅट्रीमोनीयल साईटवर नाव, अभिनेत्रीचा तीळपापड, बघा काय आहे प्रकरण?

वीणाच्या आयुष्यात एक गोष्ट घडलीय. वीणाचं नाव मॅट्रीमोनीयल साईटवर झळकलंय.

Devendra Jadhav

Veena Jagtap News: वीणा जगताप ही मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री. वीणाला आपण आजवर अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना पाहीलंय. वीणा ही अभिनेता शिव ठाकरेची गर्लफ्रेंड आहे, अशी चर्चा आहे.

वीणा सोशल मिडीयावर सक्रिय असते. पण नुकतंच वीणाच्या आयुष्यात एक गोष्ट घडलीय. वीणाचं नाव मॅट्रीमोनीयल साईटवर झळकलंय.

(veena jagtap name in matrimonial site actress got angry)

'माझा फॅन असणाऱ्या एका दादानं हा स्क्रिनशॉट मला पाठला आहे. मला खरंच कळत नाहीये की लोक असं का करतात? मॅट्रिमोनियल साईटवर खोटी माहिती. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही.

केवळ मॅट्रिमोनिअल साइटवर नाही आणि अशाच काही गोष्टी मी मागील वर्षीसुद्धा ऐकल्या होत्या. हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते. अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा.' तिची ही स्टोरी सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाली आहे.

वीणाने स्टोरीवर ही गोष्ट शेअर केलीय. वीणाने शेअर करताच तिच्या फॅन्सने सुद्धा ही गोष्ट शेअर केलीय. अभिनेत्रींचा फोटो आजकाल सर्रास कुठेही वापरला जातो.

कधी कधी परवानगी न घेता हे फोटो शेअर केले जातात. वीणाच्या बाबतीत सुद्धा असा प्रकार घडला आहे.

'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' यासारख्या दर्जेदार मालिकांमधून प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री वीणा जगतापचा चाहता वर्ग मोठा आहे. वीणा 'बिगबॉस' मध्येही सामील झाली होती. 'बिग बॉस मराठी 2' मध्ये वीणा सहभागी झाली होती.

वीणा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. वीणा आणि शिव ठाकरे यांचे बिग बॉस मध्ये जुळलेले प्रेम बरेच चर्चेत होते पण ते फार काळ टिकू शकले नाही. त्या नंतर दोघेही वेगळे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT