veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death  sakal
मनोरंजन

Ranjana Deshmukh: एका अपघातानं करियरही गेलं आणि प्रेमही.. पण अनंत आठवणी देऊन गेल्या रंजना..

ज्येष्ठ अभिनेत्री रंजना देशमुख यांचा आज 23 वा स्मृतिदिन..

सकाळ डिजिटल टीम

ranjana deshmukh death anniversary: अभिनेत्री रंजना.. म्हणजे रंजना देशमुख. ही अभिनेत्री आज जरी आपल्यात नसली तरी त्यांना आपण आजही विसरू शकलो नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक अढळ जागा निर्माण केली होती.

'बिनकामाचा नवरा', 'मुंबईचा फौजदार', 'असला नवरा नको ग बाई', 'सासू वरचढ जावई' असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. आज त्या असत्या तर त्यांचे कार्य हे एखाद्या पुस्तकात ही सामावले नसते.

परंतु 3 मार्च 2000 साली त्यांचे अकाली निधन झाले आणि त्या आपल्यातून गेल्या आणि त्यांची जागा कायमची रिकामी झाली. पण आता त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचे कारण म्हणजे आज त्यांचा 23 वा स्मृतिदिन.. त्या निमित्ताने पाहूया यांचा थोडक्यात जीवनपट.. (veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death )

रंजना या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

रंजना यांनी व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'झुंज' या चित्रपटात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली.

अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.

केवळ सिनेमाचनाही तर नाट्य विश्वातही रंजना यांनी खूप यश मिळवले. त्यांना ऐंशीच्या दशकात त्यांचा हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती. पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले.

रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी जाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. 

असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांच्या प्रेमाचे नाते होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. ते एकमेकांशी लग्नही करणार होते. परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे प्रेमही तिथेच थांबले. पुढे रंजना खचत गेल्या आणि २००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.

अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 25,100च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा एक शिलेदार गेला, त्यांनी दोन गळाला लावले; गोकुळच्या माजी अध्यक्षांसह एका नगराध्यक्षाचाही प्रवेश निश्चीत

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Marathwada Farmer : नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; मराठवाडा पुन्हा अश्रूंमध्ये भिजला, सरकार वेळीच दखल घेणार का?

Viral News: साहेब मला वाचवा ! बायको रात्री नागिन बनते अन्... घाबरलेल्या नवऱ्याच्या विनंतीने अधिकाऱ्यासह सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT