veteran Marathi Actor Rajan Patil 7 questions from Gautami Patil Facebook Post viral  Esakal
मनोरंजन

Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमातल्या राड्यामागे कोण वाटेकरी? अभिनेत्याने उभे केले गूढ सवाल

गौतमीच्या उत्पन्नात कोणी अदृश्य वाटेकरी? ज्येष्ठ मराठी अभिनेते राजन पाटील यांचा जाहीर सवाल

Vaishali Patil

Gautami Patil:  गौतमी ही मनोरंजन विश्वातील एक मोठं नावं झालं आहे. मराठी सेलिब्रेटींपेक्षा तिची क्रेझ तरुणांमध्ये जास्त आहे. तिने अख्या महाराष्ट्राला डान्सने वेड लावलं आहे. असे क्वचित लोक असतील त्यांना गौतमी पाटील कोण हे माहीती नसेल. सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. नेटकरी तिच्या डान्सला आणि व्हिडिओला पसंती देत असतात.

तिच्या कार्यक्रमात तरुण मंडळी गोंधळ घालतात आणि पोलिसांना परिस्थीती नियंत्रणात ठेवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागतो. नागपुरमधील गौतमीच्या कार्यक्रमात लोकांनी असाच गोंधळ केला आणि खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर अनेक लोक टीका करत असतात.

अशातच एका अभिनेत्याने देखील गौतमीबाबत एक पोस्ट शेयर केली आहे. यात त्यांनी गौतमी आणि तिच्या संबंधित सात प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे आणि नेटकरी देखील यावर कमेंट करत आहेत. ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील.

कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे राजन पाटील. त्यांनी आता फेसबूक पोस्टमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाबद्दल, तिच्या उत्पन्नाबद्दल आणि तिच्या व्हायरल होणाऱ्या बातम्याबाबत प्रश्न उपस्थीत केले आहेत.

राजन आपल्या पोस्टमध्ये लिहीतात की, नमस्कार मंडळी, या काही प्रश्नांची उत्तरे शोधा.

1. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो ? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञीनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल. मग आत्ताच का ?

2. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते ?

3. जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्पन्नावर आयकर भरते का ?

4. तिच्या उत्पन्नात कोणी सक्षम/सशक्त असामी वाटेकरी आहे का ?

5. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ठ पक्षाचा आहे का ? की ' तेलगी ' प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत ?

6. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जातेय अशी इमेज तयार करतायत का ?

7. 'गौतमीच्या कार्यक्रमात राडा ' यात काही काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का ?

तर या काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध त्यांनी चाहत्यांना घ्यायला लावला आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी त्याच्या यापोस्टला कमेंट केल्या आहेत.

गौतमीच्या डान्स शोला चाहत्यांची तुफान गर्दी होते. अगदी लहान मुलांपासून महिला आणि वृध्दांपर्यंत सर्वच तिच्या कार्यक्रमात दिसतात. मात्र जितकी तिच्या कार्यक्रमात गर्दी राहते तितकेच राडेही होत असतात. तिच्या बऱ्याच कार्यक्रमात दगडफेक, मारहाणीच्या घटना समोर येतात. आता अशातच राजन पाटील यांच्या पोस्टमुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT