Vicky Kaushal Birthday, Vicky Kaushal news, Vicky Kaushal movies, Vicky Kaushal wedding, Vicky Kaushal family, Vicky Kaushal arrested SAKAL
मनोरंजन

Vicky Kaushal Birthday : 'या' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलला झालेली अटक, हे आहे कारण

आज सुपरस्टार असलेल्या विकी कौशलला एकदा अटक झाली होती.

Devendra Jadhav

Vicky Kaushal once got arrested News: सब्र का फल मोठा होता है ही म्हण विकी कौशलच्या बाबतीत एकदम परफेक्ट लागू होते. विकी कौशलने आजवर त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये प्रेमाचं स्थान मिळवलं आहे. विकीचा आज वाढदिवस.

मसान या पहिल्याचं सिनेमातून विकीने अभिनेता म्हणून सर्वांना त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. आज सुपरस्टार असलेल्या विकी कौशलला एकदा अटक झाली होती.

(Vicky Kaushal once got arrested during a movie shoot of Gangs Of Wasseypur know why)

गँग्स ऑफ वासेपूर सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी याविषयी खुलासा केला. गँग्स ऑफ वासेपूर सिनेमाच्या सेटवर विकीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.

पण सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच विकीला तुरुंगाची हवा खायला लागली होती. 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या शूटिंगदरम्यान विकीला अटक करण्यात आल्याचा खुलासा अनुरागने कपिल शर्मा शोदरम्यान केला होता.

गँग्स ऑफ वासेपूर सिनेमाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने खुलासा केला की, “वासेपूर दरम्यान, विकी कौशल एकदा तुरुंगात गेला होता… आम्ही परवानगीशिवाय कुठेही शूट करत असू.

आमच्याकडे पोलीस किंवा स्थानिक अधिकाऱ्यांची लेखी परवानगी नव्हती. आणि एकदा आम्ही शूट करत असताना माफिया टोळी खरोखर अवैध वाळूची तस्करी करत होती.

आम्ही त्याचं शूटिंग करत होतो. पण याच दरम्यान पोलिसांनी विकीला पकडलं. असा खुलासा अनुराग कश्यप यांनी केला. अशाप्रकारे विकीला जेलची हवा खायला लागली होती.

विकी कौशलच्या वाढदिवसानिमीत्त त्याच्या फॅन्सना खास गिफ्ट मिळालंय. विकी कौशलचा बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान सोबत जरा हटके जरा बचके नावाचा नवीन सिनेमा येऊ घातलाय.

विकी कौशलच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जरा हटके जरा बचके सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यातील सारा अन् विकीच्या वेगळ्या अंदाजाचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coaching Center Blast: भयंकर! कोचिंग सेंटरमध्ये मोठा स्फोट, दोन विद्यार्थी जागीच ठार, अनेक जखमी, घटनेने खळबळ

Madha Flood Crisis : मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा : गोपीचंद आमदार पडळकर

Latest Marathi News Live Update : मीरा भाईंदर: थायलंड-म्यानमार सायबर रॅकेटचा पर्दाफाश

FASTag New Rule : आता नाही द्यावा लागणार डबल टोल! 'UPI पेमेंट'ने पैसे वाचणार

KDMC News : 14 गाव, 27 गाव आताच बाहेर काढून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT