Zara Hatke Zara Bachke Trailer Launch video Viral Esakal
मनोरंजन

Vicky Kaushal: 'कतरिनापेक्षा आणखी सुंदर कुणी भेटली तर घटस्फोट घेशील?.. कडक उत्तर देत विकीनं विषयच संपवला..

'जरा हटके जरा बचके' सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान पत्रकारांनी विकीला कतरिनावरनं अनेक प्रश्न विचारत हैराण करून सोडलं.

प्रणाली मोरे

Zara Hatke Zara Bachke Trailer Launch video Viral: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या त्यांच्या 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला,ज्यामध्ये विकी कौशल आणि सारा दोघंही दमदार अभिनय साकारताना दिसणार आहेत.

'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा एकत्रित असा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा २जून रोजी रिलीज होण्यास सज्ज आहे..आधी बातमी होती की शाहरुखच्या 'जवान' सिनेमामुळे या सिनेमाची रिलीज डेट ठरत नाहीय. पण आता मात्र प्रदर्शनाची तारीख लॉक करण्यात आली आहे. (Zara Hatke Zara Bachke Trailer Launch video Viral, Vicky kaushal Reaction)

या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरनं केलं आहे. तर सिनेमाची निर्मिती दिनेश विजान आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. सिनेमाची कथा इंदौरच्या दोन प्रेमी युगुलावर आधारित आहे. ही कहाणी आहे कपिल आणि सौम्याची,ज्यांना कॉलेजच्या दिवसांत प्रेम होतं आणि कुटुंबाच्या परवानगीनं दोघे लग्न करतात.

ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोघांमध्ये खूप प्रेम असतं. पण जशी जशी वर्ष सरतात यांच्यातलं प्रेम कमी होतं. आणि परिस्थिती अशी येते की दोघे एका क्षणी एकमेकांचे तोंडही पाहणे पसंत करत नाहीत आणि घटस्फोट घेण्यापर्यंत पोहोचतात.

बरं आता पुढे काय घडणार हे सिनेमात पाहूच पण खरी गंमत सांगतो ते ट्रेलर लॉंच दरम्यानची. या कार्यक्रमात विकीला पत्रकारानं थेट प्रश्न विचारला की, 'जर कतरिनापेक्षा आणखी चांगली कुणी मिळाली तर घटस्फोट घेशील का?' हा प्रश्न ऐकताच विकी अन् सोबत साराच्या चेहऱ्यावरही तीन तेरा वाजले होते.

पण विकीनं लागलीच चौकस बुद्धीचा वापर करत पत्रकाराच्या त्या प्रश्नाला असं टोलवून दिलं की पाहणारे पाहतच बसले. विकी म्हणाला,''मला संध्याकाळी घरी जायचंय माझ्या..अशा प्रश्नांची उत्तरं कशाला मागताय माझ्याकडे? मी अजून लहान आहे असे निर्णय घ्यायला..कशाला उगाच काहीही विचारता...''

पण यापुढे विकी जे म्हणाला त्यानं प्रत्येकाला खूश केलं. विकी थेट म्हणाला,''कतरिनाचं आणि माझं नातं जन्मोजन्मीचं आहे...'' बस्स..उपस्थितांमध्ये टाळ्यांचा जल्लोष झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 सप्टेंबर 2026

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT