Vidyut Jamwal and Nandita Mahtani marrying in London this month? Google
मनोरंजन

Vidyut Jamwal Wedding: अभिनेता विद्युत जामवाल आणि नंदिता मेहतानीचं लग्न, लंडनमध्ये घेणार सात फेरे?

बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत साखरपुडा केला होता.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालने(Vidyut Jamwal) गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात फॅशन डिझायनर नंदिता मेहतानी(Nandita Mahtani) सोबत साखरपुडा केला होता. यानंतर विद्युत आणि नंदिता चर्चेत आले होते. सध्या नंदिता लंडनमध्ये आहे आणि तर्क लावला जात आहे की हे कपल लवकरच लंडनमध्येच लग्नगाठ(Wedding) बांधेल. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार असं ही कानावर पडलंय की दोघांनी आधीच लग्न केलेलं आहे आणि त्यांच्या मित्रांनी हे सर्वांपासून लपवून ठेवलं आहे.(Vidyut Jamwal and Nandita Mahtani marrying in London this month?)

काही लोक फक्त हे यामुळे बोलत आहेत कारण विद्युत आणि नंदिताने आपलं अफेअर आणि साखरपुडा अनेक दिवस सर्वांपासून लपवून ठेवले होते. काही असंही म्हणत आहेत की येणाऱ्या पुढील १५ दिवसांत या दोघांचे लग्न होवू शकते. आणि लवकरच ते याची घोषणा करतील. आधी देखील विद्युत आणि नंदिताने सरप्राइज दिले आहे. विद्युत आणि नंदिताने सप्टेंबर २०२१ मध्ये ताजमहल समोर उभं राहून काढलेला फोटो शेअर करत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती.

नंदिता महतानी विषयी बोलायचं झालं तर तिचं पहिलं लग्न करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर सोबत झालं होतं. हे लग्न फार काळ टिकलं नाही. २००३ मध्ये ते विभक्त झाले. विद्युत जामवालच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'खुदा हाफिज २' काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. विद्युत आता आपल्या आगामी 'आईबी71' आणि 'शेर सिंग राणा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT