Vijay Deverakonda fails to impress fans as he arrives for liger promotions in rickshaw. Google
मनोरंजन

Liger: विजय देवरकोंडावर भडकले लोक; म्हणाले,'बंद कर सगळी नाटकं...'

'लाइगर' सिनेमाच्या निमित्तानं विजय देवरकोंडा सगळीकडे पायात चप्पल घालून रिक्षा-ट्रेनमधून फिरत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Vijay deverakonda: विजय देवरकोंडा आपल्या आगामी लाइगर(Liger) सिनेमाच्या प्रमोशनसाठी भरपूर मेहनत घेताना दिसत आहे. विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामध्ये तो एका ऑटोरिक्षा मधून एका कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाला आहे. विजय देवरकोंडाच्या या हटके अंदाजावर त्याचे चाहते मात्र भलतेच लट्टू झाले आहेत. पण काही असेही लोक आहेत ज्यांना हे सगळं खोटं-खोटं फक्त दाखवण्यापुरतं अभिनेता करतोय असं वाटत आहे. आणि प्रमोशन निमित्तानं विजयच्या या हटके अंदाजाला ट्रोलही केलं जात आहे.(Vijay Deverakonda fails to impress fans as he arrives for liger promotions in rickshaw.)

तुफान पाऊस कोसळत असताना विजय देवरकोंडा आपली लक्झरी कार सोडून एका साध्या ऑटोरिक्षामधून 'लाइगर'च्या एका प्रमोशनल कार्यक्रमाला पोहोचला होता. याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत देवरकोंडासोबत आणखी एक कुणीतरी व्यक्ती बसलेली दिसत आहे. पाहता पाहता या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पण या व्हिडीओवरनं त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्या आता वाढते आहे.

काही चाहत्यांनी त्यांची प्रशंसा करत म्हटलं आहे,'रिअल हिरो, ज्याच्यात अॅटिट्युड पहायला मिळत नाही,एकदम विनम्र अभिनेताट. तर काही असे लोक आहेत ज्यांनी विजयला प्रमोशनसाठी काहीही करणारा अभिनेता,स्वार्थी अभिनेता,लोकांच्या भावनांशी खेळणारा अभिनेता असंही म्हटलं आहे. एकानं लिहिलं आहेत,'सगळा दिखावा आहे, लोकांना दाखवण्यासाठा हा रिक्षा,ट्रेनमधून फिरतोय,पायात चंप्पल घालतोय, बंद कर हे सगळं'. तर दुसऱ्या एकानं लिहिलंय, 'खोट्या गोष्टींनी भारलेलं प्रमोशन'.

विजय देवरकोंडाचा 'लाइगर' सिनेमा २५ ऑगस्ट,२०२२ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अनन्या पांडे रोमान्स करताना दिसेल. या सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलीवूडमध्ये तर अनन्या साऊथ मध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमात या दोघांव्यतिरिक्त माइक टायसन,विशु रेड्डी, राम्या कृष्णन सारखे कलाकारही आहेत. धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT