rohit shetty 
मनोरंजन

विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत, वाचा नेमकं प्रकरण आहे तरी काय?

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- कानपूरच्या बिकरु गावात सीओ सोबत आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे एनकाउंटरमध्ये मरण पावला. ९ जुलै रोजी उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरात त्याला अटक करण्यात आली. मिडियाच्या गाड्या थांबवल्याप्रकरणी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला जातोय. याच दरम्यान सोशल मिडियावर अचानक दिग्दर्शक रोहित शेट्टीची चर्चा सुरु झाली आहे. 

त्याचं झालं असं की दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये पोलीस आणि गुंड यांच्यामध्ये अनेकदा ऍक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतो. एवढंच नाही तर रोहितच्या सिनेमात एन्काऊंटर देखील होत असतात. म्हणूनंच सोशल मिडियावर विकास दुबेच्या एनकाउंटरला रोहित शेट्टीच्या सिनेमासोबत जोडलं जातंय.

एका युजरने लिहिलंय, 'रोहित शेट्टीने सिनेमा बनवण्याआधी युपी पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे. कार उलटी करुन अपघात दाखवणं, चोराचं पळून जाणं.' तर दुस-या युजरने लिहिलंय, 'रोहित शेट्टी शेवटला ठरवेल की कार उडवायची आहे की पाडायची आहे.'

सोशल मिडियावर युजर या एनकाउंटरमुळे खूप ऍक्टीव्ह झाले आहेत. एका युजरने लिहिलंय, 'आता रोहित शेट्टी म्हणत असेल ही तर माझी स्क्रीप्ट आहे. ज्या प्रकारे कार उलटी झाली आहे मी विचार करतोय की रोहित शेट्टीला या स्क्रीप्टसाठी बोलवलं गेलं असेल.'  तर आणखी एका युजरने लिहिलंय, 'मला असं वाटतं की यावेळी रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार सगळ्यात जास्त आनंदी असतील. ते 'सुर्यवंशी'चा पुढचा भाग बनवू शकतात. काय फिल्मी एनकाउंटर आहे. शाब्बास पोलीस.'

विकास दुबेला उज्जैनवरुन आज सकाळी कानपूरला आणलं जात होतं. कानपूर जवळ येताच पोलिसांच्या कारला अपघात होऊन ती रस्त्यातंच उलटी झाली. या दरम्यान विकास दुबेने एका पोलिसाची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास आणि पोलीस यांच्यामध्ये झटापटी झाली ज्यात विकास दुबे घायाळ झाला आणि नंतर त्याला मृत घोषित केलं गेलं. 

पोलिसांनी सांगितलेल्या या एनकाउंटरच्या माहितीची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात आहे.   

vikas dubey encounter rohit shetty trending users says up police just gave script for singham  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT