vikas sawant eliminated from Bigg Boss Marathi 4 today one more contestant eliminate sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मोठा धक्का! यंदा दोन सदस्य घराबाहेर.. विकास सावंत गेला.. आज कुणाचा नंबर?

बिग बॉसचा नवा डाव की खरच दोन सदस्यांना घरचा रस्ता..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून काल विकास सावंत घराबाहेर पडला. स्पर्धकांना हा मोठा धक्का होता, कारण बिग बॉस ने याची काहीच कल्पना दिली नव्हती. अचानक महेश मांजरेकर म्हणाले, आज दोन सदस्य घराबाहेर होणार आहेत आणि सर्वांची झोप उडाली. नॉमिनेटेड सदस्यांपैकी एक एक सेफ होत गेले आणि विकास सावंतची एक्झिट झाली. पण सोबतच आजच्या भागतही एकजन बाहेर पडणार असल्याचे मांजरेकरांनी जाहीर केले त्यामुळे आजच्या भागात कोण जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

(vikas sawant eliminated from Bigg Boss Marathi 4 today one more contestant eliminate)

गेली ७५ दिवस झाले बिग बॉस मराठीचा खेळ रंगला आहे. एवढ्या दिवसात आपण अनेक वाद, भांडण अगदी हाणामारी पर्यंत सर्व घटना पहिल्या. प्रत्येक आठवड्यात एक क्षण असा असतो की ज्यावेळी भांडण बाजूला सारून सगळेच भावनिक होतात. कालच्या भागात असाच एक क्षण आला णी विकास सावंतला घर सोडावे लागले. यावेळी अपूर्वा आणि किरण माने भावूक झाले, आपल्या मित्रासाठी दोघांनाही अश्रु अनावर झाले.

विकास सावंतने घराबाहेर पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांना अनेक सल्ले दिले. हा क्षण प्रत्येकासाठीच भावनिक होता. पण येत्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डबल एलिमिनेशन पार पडणार असल्याने आज अजून एक सदस्य घराबाहेर जाणार आहे.

बाहेरच्या जगात डान्स करून आपली उपजीविका करणारा विकास सावंत ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचला. त्याला या घराने चांगलीच प्रसिद्धी मिळाली. विकास सावंत गाजला त्याचे एक कारण म्हणजे किरण माने अनई त्याची मैत्री.. त्यांच्या मैत्रीवर अनेक टीका झाल्या पण त्याचमुळे तो प्रसिद्ध झाला. शेवटच्या काही दिवसांमध्ये किरण आणि विकास मध्ये बाचाबाची झाली, अनई त्यांच्या नात्यात फूट पडली. अखेर विकासला घर सोडावे लागले आणि किरण माने भावूक झाला. विकास घराबाहेर गेल्याने आता घरातली बरीच समीकरणे बिघडणार आहेत. विशेष म्हणजे किरण माने काय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT