Vikram Gokhale Funeral Esakal
मनोरंजन

Vikram Gokhale Funeral: विक्रम गोखले अनंताच्या प्रवासाला, चाहत्यांना अश्रू अनावर...

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विक्रम गोखले यांच्यावर २६ नोव्हेंबर,२०२२ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रणाली मोरे

Vikram Gokhale Funeral: मराठी आणि हिंदी विश्वात आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. पण उपचारानंतरही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती,त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज थांबली आणि त्यांनी २६ नोव्हेंबर,२०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. (Vikram Gokhale Funeral)

विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६.३० वाजता विद्युत दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनयातील या नटसम्राटाला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अखेर अभिनयाचा हा बादशहा अनंतात विलीन झाला. विक्रम गोखले यांचे अखेरचं दर्शन घ्यायला काही कलाकार मंडळी देखील हजर होती.

विक्रम गोखले यांनी मराठी नाटक,मालिका,चित्रपट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले केवळ उत्तम नट नव्हते तर उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या चित्रपटाचे विशेष कौतूक झाले होते. २०१३ साली 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं. बॉलीवूडमधील 'हम दिल दे चुके सनम' मधील त्यांच्या भूमिकेपुढे तर सलमान-ऐश्वर्या देखील फिके पडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

Vastu Tips: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

Latest Marathi News Update : अमेरिकन नागरिकांना फसवणारे बनावट कॉल सेंटर, आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Whale Vomit 3 Crore : बाप रे! तब्बल ३ कोटींची व्हेलच्या उलटीची तस्करी, माशाची उलटी एवढी महाग का?

India vs Australia: जॉश हेझलवूडची अनुपस्थिती पथ्यावर? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होबार्टमध्ये तिसरा टी-२० सामना

SCROLL FOR NEXT