Vikram movie on ott news  esaka
मनोरंजन

Vikram OTT: कमल हासनचा 'विक्रम' ओटीटीवर, कधी होणार प्रदर्शित?

तामिळनाडूमध्ये 21 व्या दिवशी देखील विक्रमनं आपली कमाई सुरुच ठेवली आहे. यावर्षी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारी फिल्म म्हणून विक्रमचे नाव घेता येईल.

युगंधर ताजणे

Vikram OTT News: बॉलीवूडच्या तीनपेक्षा अधिक चित्रपटांना मोठा दणका देणारा टॉलीवूडचा विक्रम आता ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या विक्रमनं बॉक्स ऑफिसवर कमाईचे वेगवेगळे विक्रम (Kamal Haasan) केले आहेत. त्यामुळे बॉलीवूडचा बिग बजेट चित्रपट सम्राट पृथ्वीराज हा फ्लॉप झाला आहे. करण जोहरच्या (Karan Johar) या चित्रपटाचं बजेट तीनशे कोटींपेक्षा जास्त होते. विक्रमच्या प्रभावापुढे कार्तिक आर्यनचा भुलभुलैय्या 2, रणवीर सिंगचा जयंतीभाई जोरदार हे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. विक्रमची आता दणक्यात ओटीटीवर एंट्री होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टसनुसार, विक्रम हा ओटीटीवर येण्याची मोठी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास सम्राट पृथ्वीराज, जर्सी आणि (Akshay Kumar) जयंतीभाई जोरदार या चित्रपटांचा समावेश आहे. विक्रम अजुनही थिटएरमध्ये (Bollywood Movies) तुफान चालला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. कमल हासन, फहाद फासिल आणि विजय सेतूपति यांच्या मुख्य भूमिका असलेल्या विक्रमला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांसमोर आलेल्या कमल हासन यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

तामिळनाडूमध्ये 21 व्या दिवशी देखील विक्रमनं आपली कमाई सुरुच ठेवली आहे. यावर्षी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारी फिल्म म्हणून विक्रमचे नाव घेता येईल. विश्वम या चित्रपटाचे रेकॉर्ड विक्रमनं मोडलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिझ्ने हॉटस्टार (Vikram Movie On Disney Hotstar OTT) हा चित्रपट 8 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तो तमिळ, तेलुगू, कन्नड मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनगराज यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, त्यानं आतापर्यत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. कमी वयात मोठी कामगिरी कऱणारा तो सध्याच्या घडीला भारतातील सर्वात यशस्वी दिग्दर्शक असल्याचे म्हटले जाते.

विक्रमचे डिजिटल राईट्स हे 98 कोटींना विकले गेल्याची माहिती आहे. विक्रमची आतापर्यत कमाई चारशे कोटींपर्यत गेली आहे. हा चित्रपट अजुनही थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचताना दिसतो आहे. कमल हासन यांनी चार वर्षानंतर या चित्रपटातून एंट्री केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

Akot BJP AMIM Alliance : "मीडियाने चिंधीचा साप केला"; एमआयएमसोबतच्या युतीवर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तोडले मौन!

Pune Election Bribery : बाणेर-बालेवाडीत मतदारांना पैशांचे आमिष; पोलिसांनी दोन लाख ६३ हजारांची रोकड केली जप्त!

Latest Marathi News Live Update : अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा बसवणार

ODI मध्ये यशस्वी होण्यासाठी, ऋतुराज गायकवाडला भारत सोडण्याचा सल्ला; हा फलंदाज परदेशात असता तर...

SCROLL FOR NEXT