Virat Kohli birthday Anushka Sharma esakal
मनोरंजन

Virat Kohli birthday: पहिली भेट ते आजवरचा प्रवास;अनुष्का शर्माने दिल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या विचित्र शुभेच्छा...

सकाळ डिजिटल टीम

भारताचाच नव्हे तर सर्व जगाचा लोकप्रिय भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग कोहली सध्या ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 खेळत आहे. त्याच्या धमाकेदार कमबॅकने अनेकांना धक्काच बसला तर त्याच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह आहे.

त्यांचा यदांचा वाढदिवस विशेष महत्वाचा आहे. त्याच्या दमदार खेळीने त्याने T20 विश्वचषकात त्याच्या नावाचा डंका वाजवला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पण अनुष्का शर्माने तिच्या नवऱ्याला दिलेल्या शुभेच्छांनी सर्वाचे लक्ष वेधुन घेतले आहे.

अनुष्का शर्माने त्याला खास शुभेच्छा देतांना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनुष्का शर्माने तित्या अधिकृत इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या फनी फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहलीच्या चेहऱ्याचे भाव पाहण्यासारखे आहेत. त्याने या फोटोत वेडेवाकडे एक्सप्रेशन दिले आहेत.

हे फोटो पोस्ट करताना तिने अनोखे कॅप्शनही लिहिले त्यात ती म्हणते की, “तुझा वाढदिवस आहे. माय लव्ह , त्यामुळे साहजिकच मी या पोस्टसाठी तुझा सर्वोत्तम अँगल असलेले फोटो निवडले आहेत. प्रत्येक स्टेट, फॉर्म आणि मार्गात तुझ्यावर प्रेम करत राहणार”

तर बर्थडे बॉय विराट कोहलीनेही अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. विराटने अनुष्काच्या पोस्टवर हास्य इमोजी आणि अनेक हार्ट-साइड इमोटिकॉनसह आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या फोटोंनाही तिच्या चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2013 मध्ये पहिल्यांदा भेटले होते.

एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. कोहली आणि अनुष्का एका शॅम्पू ब्रँडची टीव्ही जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये इटलीत लग्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही खूप लाजीरवाणी गोष्ट असेल, जर रोहित शर्मा...'! गौतम गंभीरच्या Viral Video ने खळबळ; नेटिझन्स म्हणतात, त्याला हटवलं का?

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

माझ्या प्रेमाला... होणाऱ्या नवऱ्याने प्राजक्ताला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला-

Video: तेनु काला चश्मा...! योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? कातिल स्टेप्स् पाहून थक्क व्हाल

Weekly Numerology Forecast : साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य! अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक सांगणार नशिबाबद्दल खास गोष्टी!

SCROLL FOR NEXT