vishakha subhedar post about balgandharv theatre
vishakha subhedar post about balgandharv theatre  sakal
मनोरंजन

'कापडं जवळपास खेचून काढावी लागतात..' विशाखा सुभेदारची पोस्ट

नीलेश अडसूळ

Vishakha subhedar : एकीकडे रंगभूमीचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात रंगकर्मींना नाट्यगृहाच्या दुरवस्थेमुळे झगडावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरातील दुरवस्थेवर भाष्य केले होते. ही घटना ताजी असतानाच अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर भाष्य केले आहे. पुण्यातील बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांमधील अस्वच्छता आणि दुर्गंधी विषयी ती बोलली आहे. तिथे प्रयोग करणे कलाकारांना जड जात असल्याचे ती म्हंटली आहे. एवढेच नाही तर माध्यमांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती तिने केली आहे.

नुकताच तिच्या 'कुर्रर्रर्रर्र' या नाटकाचा प्रयोग पार पडला. यावेळी झालेला त्रास तिने पोस्ट लिहून व्यक्त केला. ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. विशाखा म्हणते, 'बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे ला " कुर्रर्रर्रर्र "चा प्रयोग झाला. सातत्याने गंधर्व बद्दल बातम्या कानावर येत आहेत.. बांधकाम करायचं आहे.. पण म्हणून आत्ता जे नाटका साठी वापरात येत आहेत त्याची काळजी घ्यायला नको का?' असा सवाल तिने केला आहे.

विशाखा म्हणते, 'बालगंधर्व.. (balgandharva) जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो. मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आरसे डागळलेले.. Makeup box ठेवायला त्या खालचा कट्टा जेमतेम, बसायला "खुर्च्या" नुसत्या म्हणायला.. चारपाय आणि बुड टेकायला एक फळी प्लास्टिक ची इतकीच तीची खुर्ची म्हणून ओळख.. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था.. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही..

'आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणाच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत...? बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते. प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची.काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत...!'

'आणि ac ची सोय.. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं...इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बर ह्याबद्दल तक्रार करावी तर, तर तिथले कर्मचारी म्हणतात.. कीं तो स्लोच आहे.. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय. श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ...timming साधायच, कपडे बदल, ही तारेवरची कसरत असते..

घामामुळे कपडे चिकटलेले असतात.. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंग ची वेळ बदलते.. अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही. वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा.भाडे मात्र नीट आकारलं जातं.'

आण्णाभाऊ साठे... (annabhau sathe rang mandir ) 'तिथेही तेच..अस्वच्छ बाथरूम, अंधारलेले भकास green रूम..,AC ची बोंब, आणि तिथेले स्पीकर गायब झालेले.. थिएटरचे स्पीकर चोरीला गेले.. त्यामुळे त्याचा भुर्दंड पुनः कंपनीला. Lights ची सोय फक्त एकाच पट्टी मधले ले lights चालू स्थितीत... बाकी नाहितच.प्रयोगनंतर जेवायला घेतो आम्ही अहो.. साधं बसायला खुर्च्या नसतात.. जिथे जेवायला घेणार तिथे मोडक्या लाकडी फळ्या एकावर एक टाकलेल्या.. त्यावर बसायला गेलो तर कुल्ले सोलवटुन निघतील. काहीच सोय नाही. आणि सगळ्या तुटक्या मोडक्या, गायब सोयीसाठी साठी भाडं मागितलं जातं. अतिशय निंदनीय आहेत.

'आपली परंपरा टिकविण्यासाठी. रंगभूमी टिकून राहावी, थोडेच पैसे मिळवावे म्हणून, म्हणून आम्ही सगळे कलाकार जीवाचं रान करतो. मग तिथले व्यवस्थापक, जे आहे त्याची डागडुजी करून का घेत नाहीत..आहे, ते जपत का नाही? जाऊदे,आत्ता काय मोडायचं आहे. म्हणून दुर्लक्ष करणारी कर्मचारीं मंडळी. ह्या सगळ्या च काय करायचं? आत्ता कोकण गोवा दौरा केला.. मग त्यामानाने तिथली अवस्था बरी आहे. उन्हाळा कडक आहे यंदा .हे उत्तर मात्र सगळीकडे सारखंच. ( आत्ता खरंतर ही post खरंच चर्चेत यावी... असं मनापासून वाटतं.. माझ्या सगळ्या मीडिया दोस्ताना विनंती.)' अशी खंत आणि होणारा त्रास विशाखाने आपल्या पोस्ट मधून व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT