Vivek Agnihotri Google
मनोरंजन

सब तख्त गिराए जाएंगे असे म्हणत विवेक अग्निहोत्रींची तिस्ता सेटलवाडवर टीका

देशातील महागाई, घसरता रुपया यावर सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी...

सकाळ डिजिटल टीम

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीनंतर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalwad) यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते. एसआयटीने शुक्रवारी सांगितले, तिस्ता गुजरातमध्ये भाजप सरकार पाडण्याच्या एका मोठ्या कारस्थानात सहभागी होत्या. त्यांनी यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले होते.

गुजरात दंगलीत तिस्ता सेटलवाड यांच्या भूमिकेची चौकशी करणाऱ्या एसआयटी पथकाने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब सांगितली आहे. आता यावर चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अग्निहोत्री आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मला आशा आहे की लवकरच आम्हाला सीएए विरोधी शाहीन बाग आणि शेतकरी आंदोलनाला निधी कोणी दिले ते कळेल. बाॅलीवूड सिनेतारे याचा भाग होते का? याबरोबरच पुढे चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) विचारतात सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे, हम देखेंगे. यावर युजर्संनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विजय नावाचा यूजर म्हणतो, तिस्ता सेटलवाड प्रकरणावरही काम सुरु करा. चांगला चित्रपट बनू शकतो. मारल्यानंतर कोणीही कोणावरही आरोप लावले तर मरणारा उठून थोडीच बोलणार आहे. काश्मीर फाईल्सला कोणी फंड दिला, आशा आहे की आम्हालाही त्याविषयी माहिती मिळेल, असे मनमोहन नावा यूजर म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT