Vivek Agnihotri join debates of minortiy prime minister rishi sunak  Google
मनोरंजन

अग्निहोत्रींचे नवे ट्वीट चर्चेत; म्हणाले,'जेव्हा प्रत्येक मुसलमान भारत माता की जय म्हणेल तेव्हाच...'

ऋषि सुनक यांना ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषित केलं गेलं अन् भारतात अल्पसंख्यांक गटाचा सदस्य भारताचा पंतप्रधान बनेल का? या प्रश्नावरनं नवा वाद रंगला. त्या वादात अग्निहोत्रींनी उडी घेतली आहे.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri Twert: ऋषि सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे. इंग्रजांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे,जेव्हा अल्पसंख्यांक नेता त्यांचे नेतृत्व करणार आहे. यामुळे आता भारतात वाद छेडला गेला आहे,बोललं जात आहे कोणी अल्पसंख्यांक आपल्या देशाचा पंतप्रधान बनेल का? एकीकडे जिथे कॉंग्रेस नेता शशी थरुर यांच्या प्रश्नावर भाजपानं उत्तर देत म्हटलं आहे की देशातील अल्पसंख्यांकाच्या गटातील व्यक्ती आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान बनले आहेत,तिथे आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील यांनी देखील या वादात उडली घेतली आहे. द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवर लिहिले आहे की,''जेव्हा भारतातील सर्व मुसलमान भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणतील तेव्हा देश एका मुसलमान पंतप्रधानाचा स्विकार करेल''.

विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीट मधून पत्रकार आरफा खानुमला उत्तर दिलं आहे. आरफानं ट्वीट करत लिहिलं होतं, ''आपण भारताचा पंतप्रधान मुसलमान असेल याचा स्विकार कधी करू किंवा तो निवडून देण्यासाठी कधी तयार होऊ?'' याचं उत्तर देताना अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे की,''जेव्हा भारतातील सगळे मुसलमान 'काफिर' शब्दावर बंदी आणतील, इस्लामी दहशतवादाविरोधात बेधडकपणे बोलतील, काश्मिरला भारताचाच एक भाग मानतील,आणि सगळ्यात आधी स्वतःची ओळख मनापासून भारतीय म्हणून करतील,आणि तितक्याच जोशानं भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देतील तेव्हा, तर तयार आहात यासाठी तुम्ही?''

याआधी विवेक अग्निहोत्रींनी कॉंग्रेस मंत्री शशी थरुर यांना देखील चांगलेच उत्तर दिले होते. शशी थरुर यांनी ट्वीट करत लिहिलं होतं,''अल्पसंख्यांक व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडून देत ब्रिटनच्या लोकांनी उत्तम काम केलं आहे. आपण जेव्हा या भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानासाठी आनंद व्यक्त करत आहोत तर मग मनापासून हा विचार आपल्याकडे भारतात देखील व्हायला हवा की एक अल्पसंख्यांक व्यक्ती आपला पंतप्रधान बनू शकतो,हे शक्य आहे का?''

शशी थरुर यांच्या ट्वीटला उत्तर देताना अग्निहोत्री यांनी जे वक्तव्य केलं ते बऱ्याचअंशी भाजपानं दिलेल्या उत्तराशी मिळतं जुळतं होतं. भाजपाच्याच उत्तराचा पाढा गिरवताना अग्निहोत्री म्हणाले,''१० वर्ष एक शिख व्यक्ती,जो अल्पसंख्यांक गटाचा सदस्य होता त्यानं आपलं पंतप्रधानपद भूषवलं आहे, ज्या व्यक्तीनं तुम्हाला पार्टीचा अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत हरवलं तो दलित गटाचा सदस्य होता''.

ब्रिटनचा पंतप्रधान बनल्यानंतर जिथे एकीकडे Rishi Sunak यांचं जगभरात कौतुक होत आहे ,तिथे भारतात शशी थरुर आणि पी.चिदंबरम सारख्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रश्न निर्माण केला आहे की, भारतात कधी असं होईल. आता हे स्पष्ट होत आहे की भारताचा पंतप्रधान मुसलमान असण्याकडे कॉंग्रेस नेत्यांचा इशारा आहे. पण भाजपानं याला एक वेगळाच रंग देत स्पट उत्तर दिलं आहे. पलटवार करत भाजपानं मनमोहन सिंग यांचे उदाहरण दिले आहे. भाजपानं म्हटलं आहे की, भारताचा एक शीख पंतप्रधान होता आणि तीन मुसलमान राष्ट्रपती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT