Vivek Agnihotri jumped in the controversy over Ashoka Pillar Google
मनोरंजन

'हे तर शहरी नक्षलवादी'; अशोकस्तंभ वादावरनं अग्निहोत्रींनी विरोधकांना झापलं

गेल्या काही दिवसांपासून नवीन संसदेच्या इमारतीवर सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत उभारल्या गेलेल्या अशोकस्तंभावरनं चांगलाच वाद पेटला आहे.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांत नवीन संसदेच्या इमारतीवरील सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत उभारल्या गेलेल्या अशोक स्तंभावरनं वाद पेटला आहे. या नवीन अशोक स्तंभाच्या(Ashok Stambha) अनावरणावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर(Modi Government) टोकाचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने जाणुनबुजून अशोक चक्रावर सिंहांना हिंसक दाखवत राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आता 'द काश्मिर फाईल्सचे' दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी या विरोधकांवरच निशाणा साधला आहे.(Vivek Agnihotri jumped in the controversy over Ashoka Pillar)

विवेक अग्निहोत्री यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर प्रशांत भूषण यांचे ट्वीट शेअर करत लिहिलं आहे की,''शहरी नक्षलवाद्यांना दात नसलेला सिंह हवा आहे वाटतं,म्हणजे ते यांना पाळीव प्राण्यासारखं वापरु शकतील''. एका दुसऱ्या ट्वीटमध्ये विवेक यांनी पुन्हा विरोधकांवर शाब्दिक फैरी झाडत लिहिलं आहे की,''सेंट्रल विस्टा अतंर्गत उभारलेल्या नव्या राष्ट्रीय प्रतीकानं हे सिद्ध केलं आहे की शहरी नक्षलवाद्यांना केवळ अॅंगल बदलून मूर्ख बनवलं जाऊ शकतं. खासकरुन खालच्या अॅंगलने''.

माहितीसाठी इथे सांगतो की,सोमवारी ११ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाचं अनावरण केलं. यादरम्यान लोकसभेचे स्पीकर ओम बिडला आणि राज्यसभेचे वरिष्ठ सभापतूी हरिवंश देखील उपस्थित होते. राष्ट्रीय प्रतीक हे सारनाथमधील सम्राट अशोकाच्या स्तंभाची प्रतिकृती आहे. यामध्ये चार सिंह वेगवेगळ्या दिशांना तोंड केलेले नजरेस पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT