Vivek Agnihotri sends legal notice to Bengal CM over 'defamatory' remarks on The Kashmir Files  Esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'भाजपचं चित्रपटांसाठी पैसे पुरवतो' ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर अग्निहोत्री संतापले..पाठवली नोटीस...

Vaishali Patil

'द केरळ स्टोरी'वरून सुरू असलेल्या वादात काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. आता हा वाद आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याच्या काश्मीर फाईल्स विधानावरुन ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

(Vivek Agnihotri sends legal notice to Bengal CM over 'defamatory' remarks on The Kashmir Files)

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "मी, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे." त्यांनी आमची आणि आमच्या 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द दिल्ली फाइल्स' या चित्रपटांची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी आणि बदनामीकारक विधानं केली आहेत.

एएनआयशी बोलताना विवेकने याबद्दल सांगितले की, मी बराच वेळ गप्प होतो. कोणताही मुख्यमंत्री किंवा मोठा पत्रकार याला अपप्रचार म्हणत असतो. पण आता बस्स. आता पुरे झालं. आज जो कोणी म्हणतो की हा अपप्रचार आहे, त्यांनी यावे आणि कोणती फ्रेम, कोणता शॉट, कोणती वस्तुस्थिती चुकीची आहे हे सिद्ध करावे, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करू.

कोलकाता येथील राज्य सचिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “द काश्मीर फाइल्स म्हणजे काय? एका वर्गाचा अपमान करणं आहे. 'द केरळ स्टोरी' म्हणजे काय?... ती विकृत कथा आहे. भाजप 'द केरळ स्टोरी' ही विकृत स्टोरी दाखवत आहे. काश्मीर फाइल्स आणि पुढचा चित्रपट करण्यासाठी भाजप त्यांना फंड देत आहे.

'द केरळ स्टोरी'वरुन सुरु झालेल्या या वादानंतर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली . मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "राज्यात शांतता राखण्यासाठी तसेच द्वेष आणि हिंसाचार टाळण्यासाठी द केरळ स्टोरी या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT