Vivek Agnihotri’s tweet discusses Nupur Sharma after SC’s rebuke
Vivek Agnihotri’s tweet discusses Nupur Sharma after SC’s rebuke Google
मनोरंजन

नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर अग्निहोत्रींचे tweet Viral

प्रणाली मोरे

नुपुर शर्मांच्या(Nupur Sharma) वादग्रस्त (Controversy) वक्तव्यानंतर सुप्रीम कोर्टानं(Supreme Court) त्यांना चांगलंच फटकारलं आहे पण त्यानंतर 'द काश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vicek Agnihotri) यांनी त्यावर केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. विवैक अग्निहोत्री यांनी त्या ट्वीटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे हे मात्र अचूक कळतेय. विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटवर(tweet) सोशल मीडियावर(Social media) वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गीतकार मनोज मुंतशीरने देखील यासंदर्भात सोशल मीडियावर लिहिलं आहे. पैगंबर मोहम्म्द यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना चांगलेच फटकारले आहे. तसंच,नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उदयपुरमध्ये उमटले अन् हत्याकांडासारखी मोठी घटना घडली म्हणत त्यांना देशाची माफी मागायला सांगितली आहे. नुपुर शर्मा यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपली केस दिल्लीला हस्तांतरित केली जावी असं अपील केलं होतं.(Vivek Agnihotri’s tweet discusses Nupur Sharma after SC’s rebuke)

सुप्रिम कोर्टानं ज्या शब्दात नुपूर शर्मांना फटकारलं ते चर्चेत आल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे,'पीडितांना लज्जास्पद वागणूक देणं हे आता कायदेशीर झालं आहे'. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटचा संबंध नेटकरी थेट नपूर शर्मा केसशी लावत आहेत. तर गीतकार मनोज मुंतशीर ने देखील या प्रकरणा संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यानं लिहिलं आहे,''सुप्रीम कोर्टाच्या या अशा वक्तव्यानंतर नुपूर शर्मा यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो''.

विवेक अग्निहोत्रींच्या फॉलोअर्सनी त्यांच्या ट्वीटवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'सुप्रीम कोर्टला केवळ नुपूर शर्मांना नाही,तर या प्रकरणाचा आणखी भडका उडवू पाहत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समोरच्या लोकांना देखील फटकारायला हवं. कारण वाईट शब्द तर समोरुन देखील नुपूर शर्मांना बोलले गेले आहेत. न्याय एकाच बाजूने दिला जाऊ शकत नाही'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'असंच जर चालू राहिलं तर जगात हिंदूंचा देशच नसेल. आणि हे असं व्हायला ५-१० वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार नाही'.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केल्या संदर्भात नुपूर शर्मा यांना फटकारलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की,''नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण बिघडलं. पूर्ण वाद हा टी.व्ही वरील त्या चर्चात्मक कार्यक्रमामुळे वाढला,त्यामुळे नुपूर शर्मा यांना टी.व्ही वरच पूर्ण देशाची माफी मागायला हवी''. नुपूर यांनी कोर्टाकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यावर कोर्टानं म्हटलं आहे की,''नुपूर शर्मा यांना काहीच धोका नाही पण त्यांच्यामुळे पूर्ण देश मात्र नक्कीच संकटात सापडला आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT