मुंबई- २०२०च्या मार्च महिन्यातच कोविड-१९ या जागतिक संकटाने डोके वर काढले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असलेल्या या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, काही कठोर नियमांचे पालन आपल्याला करावे लागत आहे. सेलिब्रिटी मंडळीदेखील याला अपवाद नाहीत. 'झी युवा'ने सुद्धा 'आपण राहिलो घरी, तर कोरोना जाईल माघारी' अशी साद घातली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब आणि 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेतील एक तगडी स्पर्धक असणारी अभिनेत्री धनश्री काडगावकरसुद्धा या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. अर्थात, घरीच असल्यामुळे आपले छंद जोपासण्याचा आणि मजामस्ती करण्याचा मार्ग अनेकांनी निवडलेला असल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तम नृत्याच्या जोरावर सगळ्यांच्या घरात राज्य करणारी धनश्री, सध्या किचनमध्ये रमलेली आहे. तिची स्वयंपाकाची हौस ती भागवून घेत असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर सुद्धा, तिच्या स्वयंपाकाची चर्चा सुरू आहे. चाहत्यांसाठी तिने नुकताच एक नवा विडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात तिचे पाणीपुरी प्रेम पाहायला मिळत आहे. घरी बनवलेल्या पाणीपुरीचा तिने स्वतः तर आस्वाद घेतलाच; पण, घरातील इतर मंडळींसाठी, तिने घरातच पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे. 'पाणीपुरी ठेला बाय डी अँड डी' अशी ओआति असलेला हा घरगुती पाणीपुरी स्टॉल आता चर्चेचा विषय ठरला आहे.
'अभी कुछ दिनों से लगता हैं, बदले बदले से हम हैं। क्यू कीं हम आजकल किचन में ज्यादा वक्त गुजारते हैं। हैं दिल पें शक मेरा, इसें प्यार हो गया खाना पकाने सें।' असं कॅपशन टाकून तिने हा विडिओ सोशल मीडियावर टाकलेला आहे.
तिचे पाणीपुरीचे प्रेम आणि स्वयंपाकाची आवड या दोन्ही गोष्टी, लॉकडाऊनमुळे तिच्या चाहत्यांना कळल्या आहेत. अभिनय आणि नृत्याबरोबरच, तिचे हे सुप्त गुण सगळ्यांसमोर आले आहेत.
this is what dhanashri kadgaonkar is cooking while self quarantine
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.