What photographer Ashish Shah feels On Ranveer Singh Nude Photoshoot, said... Instagram
मनोरंजन

Ranveer चे न्यूड फोटो काढणारा फोटोग्राफर आला समोर, सांगितली 'अंदर की बात'

रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट आशिष शहा नामक फोटोग्राफरने केले आहे.

प्रणाली मोरे

काही दिवसांपूर्वी रणवीरचे(Ranveer Singh) न्यूड फोटोशूट(Nude Photoshoot) सोशल मीडियावर शेअर केलं गेलं अन् त्यानंतर अभिनेत्याभोवती वादाचं चक्रच फिरु लागलं. अनेकांनी त्याच्या या धाडसाचं कौतूक केलं असलं तरी असे बरेच जण आहेत ज्यांना रणवीरचं हे न्यूड फोटोशूट खटकलं आहे. रणवीरने पेपर मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलं होतं. अनेकांनी आपल्याला नावं ठेवली असली तरी आपल्याला याची फिकर नाही, हे तर फोटोशूट आहे, मी प्रत्यक्ष हजार लोकांसमोर न्यूड होऊ शकतो. रणवीरच्या या वक्तव्यानंतर वाद अधिकच चिघळला आणि मुंबई-पुण्यात इतरत्र त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला,आंदोलनं झाली. आता या सर्व वादानंतर रणवीरच्या न्यूड अवस्थेत त्याचे फोटो क्लीक करणारा फोटोग्राफरही चर्चेत आला आहे. त्यानं रणवीरवर टीका करणाऱ्यांना फटकारत तिखट प्रतिक्रिया दिली,जी आता चर्चेत आली आहे. काय म्हणाला आहे रणवीरचे न्यूड फोटोशूट करणारा आशिष शहा? चला जाणून घेऊया सविस्तर.(What photographer Ashish Shah feels On Ranveer Singh Nude Photoshoot,) said...

आशिष शहा नामक फोटोग्राफरनं पेपर मॅगझीनसाठी रणवीरचं न्यूड फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे. या फोटोंवर टीका झाली असली तरी खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आल्याचं देखील तो म्हणाला आहे. तो म्हणाला आहे, ज्या लोकांना फोटोग्राफीचं उत्तम ज्ञान आहे, ते तंत्र ज्यांना कळतं, त्यांच्यासाठी एखाद्या चित्रासारखंच तो क्लीक केलेला फोटो असतो. आपल्या एका मुलाखतीत तो म्हणाला आहे, असे फोटोग्राफ अशा पुरुषाचेच काढले जातात ,ज्याला ते सूट करतं. आणि रणवीर त्यात एकदम फिट बसला आहे. त्याला ते सूट करत आहे.

Ranveer चे न्यूड फोटो क्लीक करताना ते खूपच काळजीपूर्वक काढले गेलेयत,ज्यासाठी तब्बल तीन तास लागले आहेत असं आशिष म्हणाला. मुंबईमध्ये बान्द्यातील मेहबूब स्टुडिओत ते फोटोशूट केलं गेलं आहे. रणवीरचे न्यूड फोटोशूट करण्याच्या अनुभवाविषयी आशिष शहा म्हणाला,मी फक्त माझी फोटोग्राफी करत होतो, माझं तंत्र,कला आणि प्रोसेस हे सगळं नीट जुळून यावं याकडे माझं लक्ष होतं. मी मला जे फोटोग्राफीच्या दृष्टीने योग्य वाटेल ते फोटो क्लीक केले आहेत,त्याचा दर्जा कुठेही ढासळू दिला नाही. मी त्यावेळी स्वतःशी खूप प्रामाणिक राहून काम केलं. ते सगळं कसं योग्य पद्धतीनं होईल हे पाहण्यासाठी आमची टीमही अतिशय विचारपूर्वक त्यावर काम करत होती. असं देखील आशिषने नमूद केले.

रणवीरच्या परफेक्ट बॉडीविषयी बोलताना आशिष म्हणाला, मला कुठेही रणवीरचे फोटो क्लीक करताना अडचण आली नाही. मला त्यावर काही इफेक्ट गेम खेळावा लागला नाही. कारण अभिनेत्याची बॉडी इतकी परफेक्ट आहे की हे फोटोशूट इतर कुणी हे करेल याचा विचारच आम्ही करु शकत नव्हतो हे फक्त रणवीरलाच सूट करेल. त्याची पर्सनॅलिटी तशी विशिष्ट स्वरुपाची आहे. इतर कुणी अभिनेता असता तर मला गिमिक करावे लागले असते.

त्याचबरोबर रणवीरविरोधात उगाचच आवाज केला जात आहे,वादाचं काहीच कारण नाही असं देखील आशिष म्हणाला. हे खूप चांगल्या पद्धतीनं स्विकारलं जाऊ शकतं. पण काही लोकांना वाद करायची सवयच लागून राहिली आहे. आपण असेच जन्माला येतो,तेव्हा सर्वच गोड असतं मग आता का? ट्वीटर-इन्स्टाग्रामला हक्काचा प्लॅटफॉर्म समजत लोक रणवीर विरोधात सूर उमटवत आहेत.

यादरम्यान, रणवीर सिंगवर आता अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी योग्य कारवाई करु असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढाईत रणवीर कशी बाजू मांडतो हे पाहणं अधिक महत्त्वाचं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

साडी नेसलेला सचिन जोरात ओरडला आणि रिक्षावाला घाबरला... निवेदिता यांनी सांगितला 'बनवाबनवी'च्या शूटिंगचा किस्सा

Latest Marathi News Live Update : ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार निवडणूका

Chakan Nagarparishad Election : कही खुशी, कही गम ! चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण

Manchar Nagarpanchyat Election : नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड; मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव

SCROLL FOR NEXT